
वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय (Union Ministry of Road Transport) ने सीएनजी (CNG) किटबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. याचा परिणाम अनेक कार चालकांवर होणार असून आता तुम्ही लवकरच BS-6 पेट्रोल वाहने CNG किटसह रस्त्यावर चालवू शकाणार आहात. सरकारच्या अधिसूचनेनुसार भारत स्टेज (BS-6) वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट तसेच 3.5 टनापेक्षा कमी वजनाचे डिझेल-पेट्रोल इंजिन हे CNG/LPG किटमध्ये बदलण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
आता BS-VI उत्सर्जन नियमांनुसार मोटार वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट करण्याची परवानगी होती. पण नव्या प्रस्तावित हालचालीमुळे सर्व नवीन वाहनांना भारत VI उत्सर्जन मानदंडांच्या CNG वाहनांमध्ये रूपांतरित करता येईल. याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीएनजी हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि धुराच्या उत्सर्जनाची पातळी कमी होईल.
अनेकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने 30 दिवसांच्या आत सूचनाही मागवल्या आहेत जेणेकरुन आवश्यक असल्यास ते आपल्या अंतिम अधिसूचनेत आवश्यक बदल करू शकेल. मंत्रालयाने म्हटले आहे की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 27 जानेवारीच्या अधिसूचनेमध्ये भारत स्टेज (बीएस) गाड्यांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किटच्या रेट्रो फिटिंगद्वारे बदल करण्यास आणि सीएनजी/एलपीजी इंजिनसह डिझेल इंजिन बदलण्याची परवानगी दिली आहे. . आत्तापर्यंत, सीएनजी आणि एलपीजी किटचे रेट्रो फिटमेंट फक्त बीएस-IV उत्सर्जन मानदंड असलेल्या वाहनांमध्येच परवानगी आहे.
हेही वाचा: स्वस्तात खरेदी करा Micromax In Note 2; पाहा किंमत, स्पेसिफिकेशन्स
तीन वर्षांची असेल वैधता
मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की सीएनजी किटसह रेट्रोफिट केलेल्या वाहनांसाठी टाइप अप्रुव्हल ही मान्यता जारी केल्याच्या तारखेपासून तीन वर्षांसाठी वैध असेल. यानंतर, दर तीन वर्षांनी एकदा त्याचे नूतनीकरण करावे लागेल. खास उत्पादित वाहनांसाठी सीएनजी रेट्रोफिटसाठी मान्यता दिली जाईल.
कारमध्ये बसवलेले केलेले सर्व सीएनजी किट अस्सल नसतात, त्यामुळे तुमच्या कारमध्ये कोणतेही सीएनजी किट बसवण्यापूर्वी, त्याची सत्यता ओळखा. तुम्ही स्थानिक विक्रेत्याकडून किट घेणे टाळले पाहिजे आणि अधिकृत डीलरकडूनच किट इंस्टॉल करा. खराब दर्जाचे किट आणि अयोग्य फिटिंगमुळे गळती होऊ शकते. त्यामुळे आग लागण्याचा धोका आहे.
हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण
Web Title: Government Proposes To To Allow Retrofitting Cng Lpg Kit In Bs Vi Compliant Vehicles Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..