Scam Alert : 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'ची प्रकरणे पुन्हा वाढली, केंद्र सरकारने दिला गंभीर इशारा! कशी होते फसवणूक?

अशा प्रकारे कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यास, तुम्हाला येणारे महत्त्वाचे ओटीपी किंवा टेक्स्ट मेसेजवर येणारे पासवर्ड देखील नवीन नंबरवर फॉरवर्ड होतात. त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.
Scam Alert
Scam AlerteSakal

Call Forwarding Scam : केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाने एक गंभीर इशारा दिला आहे. देशात कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणे वाढत असल्याचं सरकारने सांगितलं आहे. या स्कॅममध्ये हॅकर्स एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरील सर्व कॉल आणि मेसेज आपल्या एखाद्या नंबरवर फॉरवर्ड करून घेतात. या माध्यमातून पुढे गंभीर फसवणूक होते.

सरकारने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे, की लोकांनी संशयास्पद फोन कॉल्सपासून सावध रहावं. विशेषतः अशा कॉलपासून ज्यामध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला *401# डायल करायला सांगत असेल. स्कॅमर्स हा नंबर डायल करायला सांगून, पुढे एक अनोळखी फोन नंबर एंटर करायला सांगतात. यामुळे कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू होते. (Cyber Scam Alert)

कशी होते फसवणूक?

टेलिकॉम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाच टप्प्यांमध्ये स्कॅमर्स तुमची फसवणूक करू शकतात.

  1. स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या सिमकार्ड सर्व्हिस प्रोव्हाईडरचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचं सांगतात.

  2. तुमच्या सिमकार्डमध्ये काही बिघाड झाल्याचं सांगून, त्यामुळे नेटवर्क आणि सर्व्हिस क्वालिटी खराब होत असल्याचं सांगतात.

  3. ही समस्या सोडवण्यासाठी स्कॅमर तुम्हाला एक कोड एंटर करायला सांगतात.

  4. हा कोड शक्यतो *401# असा असतो. या कोडसमोर ते एक फोन नंबर एंटर करायला सांगतात.

  5. यानंतर तुमच्या सिमवर येणारे सर्व कॉल आणि मेसेज तुम्ही एंटर केलेल्या नंबरवर फॉरवर्ड होतात.

Scam Alert
Cyber Scam : 113 रुपयांचा रिफंड मागायला केला कॅब कंपनीला फोन; अन् खात्यातून गायब झाले 5 लाख! काय आहे हा स्कॅम?

अशा प्रकारे कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यास, तुम्हाला येणारे महत्त्वाचे ओटीपी किंवा टेक्स्ट मेसेजवर येणारे पासवर्ड देखील नवीन नंबरवर फॉरवर्ड होतात. त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.

कशी घ्याल खबरदारी?

टेलिकॉम मंत्रालयाने सांगितलं, की कोणताही टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कर्मचारी तुम्हाला *401# हा नंबर एंटर करायला सांगत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कोणताही कॉल आल्यास त्वरीत तो नंबर ब्लॉक करावा. तसंच, आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधून आपल्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू आहे की नाही हे तपासून घ्यावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com