Grok AI : ‘ग्रोक’ची जीभ घसरली, केंद्राने मागविला डेटासेट; शिवीगाळीची गंभीर दखल, सरकारी पातळीवर कारवाईची तयारी
Social Media Regulation : ग्रोक एआय चॅटबॉटच्या अशोभनीय भाषेमुळे केंद्र सरकारने 'एक्स' कडून खुलासा मागविला आहे. सरकारने डेटासेट तपासणीसाठी मागवून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' कडून चालविल्या जाणाऱ्या ग्रोक एआय चॅटबॉटकडून वापरकर्त्यांना अपशब्द वापरले जात असून त्यांना शिवीगाळ देखील केली जात असल्याचे समोर आले आहे.