

GTA 6 Launches in India: Check Price, 212GB Size & Platforms
esakal
GTA 6 Craze Grips Gaming World: भारतासह जगभरातील गेमिंग प्रेमी ज्या क्षणाची गेल्या 13 वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. रॉकस्टार गेम्सचा (Rockstar Games) बहुप्रतीक्षित व्हिडिओ गेम Grand Theft Auto 6 (GTA 6) आज 19 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजता भारतात अधिकृतपणे लॉंच झाला आहे. या गेमची क्रेझ इतकी प्रचंड आहे की, ब्रिटनमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी हा गेम खेळण्यासाठी चक्क ऑफिसमधून सुट्टी घेतली असून सुट्टीच्या अर्जात (Email) थेट GTA 6 खेळण्याचे कारण नमूद केले आहे.
कंपनीने जाहीर केल्यानुसार, हा गेम प्रत्येक देशात त्यांच्या स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजता उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील गेमर्सना हा गेम सर्वात आधी खेळण्याची संधी मिळाली, तर भारतात 19 नोव्हेंबरच्या पहाटेपासून गेमर्स या नव्या जगात रममाण झाले आहेत.