Heroच्या 'या' बाईकची विक्री सर्वाधिक, किंमत ६५ हजारांपेक्षा कमी

हिरो मोटोकाॅर्प देशातील सर्वाधिक दुचाकी वाहन उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनी प्रत्येक महिन्याला लाखो मोटारसायकल्सची विक्री करते.
Hero Splendor Plus
Hero Splendor Plusesakal

हिरो मोटोकाॅर्प (Hero MotoCorp) देशातील सर्वाधिक दुचाकी वाहन उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनी प्रत्येक महिन्याला लाखो मोटारसायकल्सची विक्री करते. मात्र हिरोची एक मोटारसायकल अशी आहे जिची विक्री सर्व माॅडल्सपेक्षा अधिक झाली आहे. ती बाईक म्हणजे हिरो स्प्लेंडर. गेल्या महिन्यात (सप्टेंबर २०२१) कंपनीने जितक्या मोटारसायकल विकल्या त्यात निम्मी हिरो स्प्लेंडर (Hero Splendor Plus) होती.

देशात सर्वाधिक विकली जाणारी बाईक

गेल्या महिन्यात हिरो मोटोकाॅर्पने देशात मोटारसायकल्सची एकूण ५ लाख ५ हजार ४६२ युनिट्स विकले आहेत. विशेषतः त्यात जवळपास निम्म्या बाईक हिरो स्प्लेंडरचा समावेश होता. सप्टेंबर २०२१ मध्ये हिरो स्प्लेंडरची एकूण २ लाख ४६ हजार ९ युनिट्स विकली होती. दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात पूर्ण देशात सर्वाधिक विकली जाणारी स्प्लेंडर दुचाकी होती. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तुलनेत या बाईकने १४ टक्के वार्षिक वाढही नोंदवली आहे.

Hero Splendor Plus
Volkswagen Taigunची महिन्याभरात १८ हजार बुकिंग,जाणून घ्या फिचर्स

हिरो स्प्लेंडरची किंमत आणि फिचर्स

कंपनीने आपली स्प्लेंडर बाईकचे तीन माॅडल्स सादर केले आहेत. त्यात Splendor plus, Splendor iSmart आणि Super Splendor आदींचा समावेश आहे. ती क्रमश: १०० सीसी, ११० सीसी आणि १२५ सीसी इंजिनबरोबर येतात. किंमतींचा विचार केल्यास स्प्लेंडर प्लसची किंमत ६४ हजार ८५० रुपयांपासून ७० हजार ७१० रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे स्प्लेंडर आयस्मार्टची किंमत ६९ हजार ६५० रुपयांपासून किंमत सुरु होते. डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत ७२ हजार ३५० रुपयांपर्यंत जाते. सुपर स्प्लेंडरची किंमत ७३ हजार ९०० रुपयांपासून ७७ हजार ६०० रुपये ( सर्व किंमती, एक्स शोरुम नवी दिल्ली) आहे. सर्वात स्वस्त माॅडलचा विचार केल्यास स्प्लेंडर प्लसमध्ये कंपनी ९७.२सीसी इंजिन देते. ते इंजिन ८.०१ पीएसची पाॅवर आणि ८.०५Nm चे पीक टाॅर्क जेनरेट करण्यास सक्षम आहे. त्यात आयताकृतीचे हेडलाईट मिळते. जे की वर्षानुवर्षी स्प्लेंडरची ओळख बनली आहे. बाईकमध्ये i3s टेक्नोलाॅजी मिळते. जे ५ सेकंदापर्यंत ट्रॅफिकमध्ये उभे राहिल्यावर बाईक ऑटोमॅटिकली बंद करते. बाईकमध्ये ट्युबलेस टायर्स देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com