

Beware of Netflix subscription expired WhatsApp scam
esakal
सायबर गुन्हेगारांनी आता Netflix सारख्या लोकप्रिय सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन फसवणुकीची एक नवीन आणि एकदम घातक पद्धत शोधली आहे. यामध्ये युजरला "Hi Dear" किंवा "Your subscription has expired" अशा व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज पाठवला जातो. या मेसेजमध्ये एक लिंक असते जी हुबेहूब नेटफ्लिक्सच्या अधिकृत पेमेंट पेजसारखी दिसते. जेव्हा एखादी व्यक्ती घाईघाईत किंवा घाबरून त्या लिंकवर क्लिक करते आणि आपली बँक खात्याची माहिती किंवा युझर ID पासवर्ड टाकते तेव्हा सायबर भामटे काही सेकंदात त्यांचे संपूर्ण बँक खाते रिकामे करतात. गृह मंत्रालयाच्या 'सायबर दोस्त' (I4C) विभागाने या वाढत्या धोक्याबद्दल विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.