esakal | दमदार मायलेज सोबत येतेय होंडा सिटी हायब्रीड, पाहा फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Honda City Hybrid

दमदार मायलेज सोबत येतेय होंडा सिटी हायब्रीड, पाहा फीचर्स

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

होंडा कंपनीसेडान सेगमेंटमधील होंडा सिटीची पुढील आवृत्ती होंडा सिटी हायब्रिड (Honda City Hybrid) भारतीय बाजारात लॉंच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने त्याची लॉन्चची अधिकृतपणे घोषणा देखील केली आहे की, पुढील वर्षापर्यंत ही कार भारतीय बाजारात दाखल होईल.

कंपनीने या सेडान होंडा सिटीच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.5 L i VTEC इंजिन दिले आहे. तसेच, या मॉडेलमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीव्हीटी दोन्ही ऑप्शन्स दिले आहेत. हे इंजिन 6000rpm वर 121ps आणि 4300rpm वर 145Nm टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल व्हेरियंट 17.8 लिटर प्रति तास मायलेज देते, तर कंपनी दावा करते की CVT व्हेरियंट हे 18.4 लिटर प्रति तास मायलेज देईल. मात्र नवीन होंडा सिटी हायब्रिड मॉडेलची रस्त्यावर टेस्टींग झालेली नाही, पण इतर देशांत घेतलेल्या टेस्ट्समध्ये या कारचा परफॉर्मन्स दमदार राहिला आहे. त्यामुळे हे नवीन हायब्रिड मॉडेल त्याच्या आधीच्या व्हेरियंटपेक्षा चांगले मायलेज देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय? 'या' ट्रिक्स वापरुन वाढेल स्पीड

सिटी हायब्रिडमध्ये, इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्र दिलेल्या असतील. हायब्रिड व्हर्जन साधारण होंडा सिटीपेक्षा 110 किलो जड आहे. यात 410-लिटरची बूट स्पेस दिला आहे, जो रेगुलर मॉडेलपेक्षा जवळजवळ 100-लिटर कमी आहे. तसेच या मॉडेलमध्ये मागील डिस्क ब्रेक, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक देण्यात आले आहेत. ग्लोबल-स्पेक मॉडेलला होंडा सिटी आरएस म्हटले जाते, आणि यामध्ये एडीएएस रडार आधारित सुरक्षा फीचर्स तसेच रिमोट इंजिन स्टार्ट फीचर देखील देण्यात आले आहे. भारतात होंडा सिटी हायब्रिडची किंमत 17.5 लाख ते 19 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: जिओचे सर्वात स्वस्त प्लॅन, 4 रुपयांपेक्षा कमीत मिळतो 1GB डेटा

loading image
go to top