मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honda Livo
मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा

मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा

नवी दिल्ली : टु-व्हिलर सेक्टरमध्ये मायलेजवाली बाईकची मोठी रेंजी उपलब्ध आहे. काही अशाही बाईक आहेत, ज्या मायलेज आणि स्टायलिश डिझाईनसाठी पसंत केल्या जातात. आम्ही बोलत आहोत होंडा लिवो (Honda Livo). ती एक आकर्षक डिझाईनवाली मायलेज देणारी बाईक आहे. होंडा लिवो जर तुम्ही खरेदी केल्यात तुम्हाला त्यासाठी ७१ हजार ५८३ रुपयांपासून ७५ हजार ७८३ रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. जर तुमच्या जवळ ही बाईक खरेदी करण्यासाठी इतके मोठे बजेट नाही. तर येथे जाणून घ्या सहज डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जाण्याचे सोपा प्लॅन ..

टु-व्हिलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाईट BIKEDEKHO वर दिलेले डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार जर तुम्ही या बाईकचे डिस्क ब्रेक व्हेरियंट खरेदी करत असाल तर कंपनीशी जोडलेली बँक या बाईकवर ८० हजार ८०३ रुपयांपर्यंत कर्ज देते. या कर्जावर तुम्हाला ८ हजार ९७८ रुपयांचे किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला २ हजार ८९७ रुपयांचे ईएमआय द्यावे लागेल. या बाईकवर मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी ३६ महिने आहे. बँक कर्जावर ९.७ टक्के वार्षिक व्याज दर लागेल. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर ती डाऊन पेमेंट प्लॅननंतर जाणून घ्या मायलेज आणि स्पेसिफिकेशनचे पूर्ण तपशील...

- होंडा लिवो एक आकर्षक डिझाईनवाली मायलेज देणारी बाईक आहे. कंपनीने ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या बाईकमध्ये सिंगल सिलिंडरवाला १०९.५१ सीसीचे इंजिन जे एअर कुल्ड तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे.

- हे इंजिन ८.७९ पीएसचे पाॅवर आणि ९.३० एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर ४ स्पीड गिअरबाॅक्स दिले गेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टिमविषयी बोलाल तर तिचे फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅबिनेशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे, की होंडा लिवो ७६ किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज देते. ते मायलेज अराईद्वारा प्रमाणित आहे.

(सूचना : होंडा लिवोवर मिळणारे कर्ज, डाऊन पेमेंट आणि व्याज दर तुमची बँकिंग आणि सिबिल स्कोरपर आधारित असेल.)

loading image
go to top