Honor कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, Honor Magic VS2 म्हणजे 'स्टाईल स्टेटमेंट'

कंपनीने फोल्डेबल पोर्टफोलिओही वाढवला आहे
Honor's Foldable Smartphone
Honor's Foldable Smartphoneesakal

Honor's Foldable Smartphone : सुप्रसिद्ध चीनी स्मार्टफोन कंपनी Honor ने आपला नवीन फोल्डेबल फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. यासोबतच कंपनीने फोल्डेबल पोर्टफोलिओही वाढवला आहे. Honor Magic VS2 स्मार्टफोन कंपनीच्या मागील फोल्डेबल Honor Magic VS2 चे पुढचे व्हार्जन आहे. हा फोन सर्वप्रथम नोव्हेंबर 2022 मध्ये चीनमध्ये लॉन्च झाला होता.

या स्मार्टफोनमध्ये 120Hz OLED डिस्प्ले मिळेल. Snapdragon 8+ Gen 1 चीपसेटसह प्रोसेसर जोडलेला आहे. हा स्मार्टफोन चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर लॉन्च करण्यात आलाय. या फोल्डेबल फोनसोबतच कंपनीने नवीन वॉच 4 प्रो देखील लॉन्च झालंय. या उपकरणात स्टेनलेस स्टील बॉडी, LTPO AMOLED स्क्रीन आणि GPS सपोर्ट आहे.

Honor's Foldable Smartphone
Mental health : आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर काय करावं?

Honor Magic VS2 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 युआन म्हणजेच अंदाजे 80,000 रुपये असेल. तर त्याच्या 16GB + 512GB मॉडेलची किंमत 7,699 युआन म्हणजेच अंदाजे 88,000 रुपये असेल. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. यामध्ये वेल्वेट ब्लॅक (फेदर फायबर बॅक), ग्लेशियर ब्लू (फेदर फायबर बॅक) आणि कोरल पर्पल (प्लेन लेदर बॅक) प्रकार उपलब्ध असतील. चीनमधील ग्राहक आता या फोनची प्री-ऑर्डर करू शकतात. ज्याची शिपिंग 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तुम्ही हे डिव्हाइस Honor Mall, प्रमुख अधिकृत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि Honor Experience स्टोअर्समधून खरेदी करू शकता.

Honor's Foldable Smartphone
Health Care News: तुम्हालाही ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे का? या गोष्टी खाल्ल्याने मिळतो आराम

टायटॅनियम बॉडीसह आधुनिक फीचर्स

Honor Magic VS2 मध्ये, ग्राहकांना 7.92-इंचाचा LTPO OLED अंतर्गत डिस्प्ले मिळतो. जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह जोडलेला आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाची LTPO OLED बाहेरील स्क्रीन आहे. यामध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आलाय. याशिवाय स्मार्टफोनमध्ये अन्य काही महत्त्वाचे फीचर्स आहेत. यामध्ये डिस्प्ले डॉल्बी व्हिजन, IMAX आणि TUV राइनलँड फ्लिकर-फ्री समाविष्ट आहे. मॉडेलमध्ये लुबान टायटॅनियम वापरण्यात आल्याने मजबूत फोल्डिंग सिस्टम तयार झाली आहे.

Honor's Foldable Smartphone
World Mental Health Day: 100 मागे 30 जण मानसिक आजारी; जिल्ह्यात वर्षभरात 20 हजार जणांवर मानसिक उपचार

ट्रिपल रिअर कॅमेरा

या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 20MP टेलिफोटो लेन्स आहे. याशिवाय यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे.बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या मॉडेलमध्ये 5000mAh बॅटरी युनिट आहे. याला 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com