
Earthquake Alerts : उत्तराखंडमध्ये आता भूकंप येण्याआधी लोकांना चेतावणी मिळणार आहे. उत्तराखंड राज्य आपदा व्यवस्थापन विभागाने 'भूदेव' ॲप लाँच केले आहे, जे ५ किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाच्या आधी मोबाईल फोनवर अलर्ट पाठवेल. यामुळे लोक भूकंपाच्या आगोदर सतर्क होऊन आपली आणि मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करू शकतील. हे ॲप उत्तराखंड राज्य आपदा व्यवस्थापन प्राधिकरण (USDMA) आणि IIT रुडकी यांनी मिळून विकसित केले आहे आणि हे देशातील पहिले ॲप आहे जे भूकंपाच्या पूर्वी चेतावणी देईल.