हरवलेला iPhone शोधणे आहे सोपे, अगदी काही मिनीटातच समजेल लोकेशन

टीम ईसकाळ
Thursday, 8 April 2021

तुमचा आयफोन हरवला आणि तो पुन्हा कसा शोधायचा तसेच सापडला नाही तर त्यामधील डेटा कसा कायमचा डिलीट करायचा हे जर का तुम्हाला माहिती नेसल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. मात्र आपण आज आपण आपला आयफोन चुकीच्या हातात सापडण्यापूर्वी ट्रॅक कसा करावा आणि आयफोनमधील डेटा कसा कायमचा डिलीट कारावा ते जाणून घेणार आहोत.

पुणे : तुमचा आयफोन हरवला आणि तो पुन्हा कसा शोधायचा तसेच सापडला नाही  तर त्यामधील डेटा कसा कायमचा डिलीट करायचा हे जर का तुम्हाला माहिती नेसल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. मात्र आपण आज आपण आपला आयफोन चुकीच्या हातात सापडण्यापूर्वी ट्रॅक कसा करावा आणि आयफोनमधील डेटा कसा कायमचा डिलीट कारावा ते जाणून घेणार आहोत.

 Apple चे Find My iPhone  फीचर वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि याद्वारे आपण आपल्या हरवलेल्या आयफोनचे लोकेशन शोधू शकता, तुमचा फोन असेल तेथे वाजू लागतो ... इतकेच नाही तर आपल्याला गरज  असल्यास आयफोनमध्ये असलेला डेटा डिलीट देखील करता येतो.  

हे सर्व ऑप्शन वापरण्यासाठी तुम्हाला फोनमघ्ये Find My iPhone  फीचर एक्टिवेट करावे लागेत  त्यासाठी पुढील ्स्टेप्स फॉलो करा.

- सेटिंग्ज उघडा.

-आता  सेटिंग्ज स्क्रीनच्या पहिल्या टॅबमध्ये सर्च बारच्या खाली  Apple ID दिसेल.

-आता आयक्लॉड आणि मीडिया अँड पर्चेस नंतर तिसरा पर्याय असलेल्या फाइंड माय ऑप्शनवर क्लिक करा.

- यानंतर फाइन्ड माय आयफोन पर्याय निवडा. आता फाइंड माय आयफोन ऑप्शन ऑन करा. 

वर नमूद केलेल्या चरण पूर्ण केल्यानंतर, आपण आपला गमावलेला आयफोन शोधण्यास तयार आहात. आपल्या हरवलेल्या आयफोनचे स्थान शोधण्यासाठी किंवा डेटा हटविण्यासाठी, आयक्लॉड / फाईंडवर साइन इन करा.
 
नकाशावर दिसेल हरवलेला आयफोन 

- यानंतर  icloud.com/find  लिंकवर जा आणि साइन इन करा

 केल्यानंतर ब्राउझरद्वारे Apple ID आणि पासवर्ड इंटर करा. लगेच आपल्या आयफोनचे लोकेशन डिटेक्ट होणे सुरु होईल.

त्यानंतर काही सेकंदांच आपल्या आयफोनचे लोकेशन स्क्रीनवरील नकाशामध्ये दिसायला लागेल.

 
हरवलेल्या आयफोनवर आवाज प्ले करा

फोन शोधल्यानंतर, आपल्याला नकाशाच्या वरच्या बाजूला सर्व डिव्हाइस दिसतील, ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल त्यासाठी..

- ड्रॉप-डाउन मेनूवर आपले हरवलेला आयफोन मॉडेल निवडा.

-आता स्क्रीनच्या वरच्या-उजव्या कोपर्‍यात एक फ्लोटिंग बॉक्स येईल, ज्यामध्ये आपल्या आयफोनचे फोटो, फोनचे नाव आणि उर्वरित बॅटरी दिसून येईल.

- आता आपण प्ले साऊंड बटणावर क्लिक करा, जेणेकरून आपला फोन वायब्रेट होईल आणि बिपींग साऊंड हळू हळू वाढत जाईल. जेव्हा आपण आपला आयफोन जवळपासच्या खोलीत किंवा जवळपासच्या ठिकाणी विसरता तेव्हा हे फिचर विशेषतः उपयुक्त ठरते. आवाज थांबविण्यासाठी आपण आपला फोन अनलॉक करणे आवश्यक आहे.
 
 आयफोन हरवला म्हणून कसे मार्क कराल?

- फ्लोटिंग विंडोवरील गमावलेल्या लॉस्ट मोडवर क्लिक करा.

-आपल्याकडे एक पर्यायी फोन नंबर देण्यास सांगितले जाईल. हा नंबर आपल्या हरवलेल्या आयफोनवर येईल. आता आपल्याला एक कस्टम मॅसेज इंटर करण्यास सांगितले जाईल जे आपल्या आयफोनवर देखील दिसून येईल. लक्षात ठेवा की या स्टेप्स पर्यायी आहेत. लॉस्ट मोडमध्ये सर्व डेटा सुरक्षित राहावा यासाठी आपला आयफोनला एका पासकोडसह लॉक केला जातो.

-आता डन वर क्लिक करा.
 

 डेटा कसा डिलीट करायचा?

-फ्लोटिंग विंडोमधून Erase iPhone बटणावर क्लिक करा.

- आपल्याला एका पॉप-अप मॅसेजमध्ये कंफर्मेशन विचारले जाईल. लक्षात ठेवा की आपल्या फोनमधील सर्व डेटा कंन्फर्म करताच हटविला जाईल. तसेच डेटा डिलीट केल्यानंतर आयफोन लोकेट आणि ट्रॅक करता येत नाही. 

- आता Erase वर क्लिक करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to find location of your lost iphone and erase data remotely Marathi Article