
Independence Day Google Doodle Celebration : आज भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत आहे. या खास प्रसंगी Google ने एक आकर्षक आणि अर्थपूर्ण डूडल सादर करून देशाच्या उल्लेखनीय यशांना सलाम केला आहे. या डूडलमध्ये भारताच्या अवकाश मोहिमांपासून ते जागतिक बुद्धिबळ विजेतेपद, क्रिकेटमधील यश आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रातील मान्यतेपर्यंतच्या यशोगाथांचे चित्रण करण्यात आले आहे. हे डूडल बुमरँग स्टुडिओच्या कलाकार मकरंद नरकर आणि सोनल वासवे यांनी साकारले आहे.