

How Extreme Heat Alone Raises Suicide Risk University of Utah study
esakal
नवीन अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उकाडा आणि हवेतील प्रदूषण हे दोन्ही मिळून मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम करतात. अमेरिकेतील युटा राज्यात २००० ते २०१६ या १६ वर्षांत झालेल्या सुमारे ७,५०० आत्महत्यांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. युटा विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला असून तो आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.