Block Spam Calls: स्पॅम कॉल्सला वैतागला? Jio-Airtel-Vi यूजर्स असे करू शकतात बनावट नंबर्सला ब्लॉक

महत्त्वाच्या मिटिंगमध्ये किंवा कामात असताना अचानक स्पॅम कॉल आल्यावर समस्या निर्माण होते.
Block Spam Calls
Block Spam Callssakal

स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, आज आपण या डिव्हाईसद्वारे जवळपास सर्व काही करू शकतो. तुम्हाला एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असेल किंवा इमरजेंसीमध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचायचे असेल, सर्वकाही स्मार्टफोनमुळे शक्य आहे.

स्मार्टफोनमुळे एकीकडे आपले जीवन सोपे झाले आहे, तर दुसरीकडे अनेक समस्याही आहेत. आपल्या सर्वांना प्रमोशनल कॉल्स किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॉल येत राहतात. या कॉल्समुळे दररोज त्रास आणि चिडचिडीला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर असे स्पॅम कॉल्स कायमचे कसे ब्लॉक करू शकता ते सांगणार आहोत.

खाली नमूद केलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही Vodafone-Idea, Jio आणि Airtel चे स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता.

अशा प्रकारे ब्लॉक करा

स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन मेसेज टाइप करावा लागेल. तुम्हाला मोठ्या अक्षरात FULLY BLOCK लिहावे लागेल आणि ते 1909 वर पाठवावे लागेल.

तुम्ही हा मेसेज पाठवताच काही वेळाने तुम्हाला टेलिकॉम ऑपरेटरकडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुमच्या नंबरवर पूर्ण DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय झाली आहे असे लिहिलेले असेल. यासोबत तुम्हाला कोणतेही अनावश्यक स्पॅम कॉल्स येणार नाहीत.

Block Spam Calls
Jio Cloud Laptop : कम्प्युटर कंपन्यांचं टेन्शन वाढलं, जिओ लाँच करणार 'क्लाऊड लॅपटॉप'; काय आहे हा प्रकार?

अशा प्रकारे तुम्ही स्पॅम कॉल ओळखू शकता

स्पॅम कॉल ओळखण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइल फोनमध्ये Truecaller अॅप इन्स्टॉल करू शकता. हे अॅप तुम्हाला रेड मार्कसह सर्व प्रकारच्या स्पॅम कॉलबद्दल अलर्ट करते. हे पाहून तुम्ही असे कॉल टाळू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com