esakal | Google ची भाषा आणि फेवरेट टॉपिक बदला, ही आहे सोपी पध्दत

बोलून बातमी शोधा

google
Google ची भाषा आणि फेवरेट टॉपिक बदला, ही आहे सोपी पध्दत
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

गुगल डिस्कवर वर आपण बर्‍याचदा नवीन माहिती शोधतो आणि बरेच लेख वाचतो. बर्‍याच वेळा हे लेख हिंदी भाषा सोडून इतर भाषेत दिसू लागतात. म्हणून आज आपण आपली आवडती भाषा कशी सेट करावी ते जाणून घेणार आहोत. आपण आपले आवडते विषय कस्टमाइज देखील करू शकता.

भाषा बदलण्यासाठी काय करावे?

गूगल डिस्कव्हर मधील भाषा बदलण्यासाठी आपल्याला उजवीकडे तळाशी असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, सेटिंग्सचा ऑप्शन दिसेसल त्यावर क्लिक करा. यानंतर भाषा आणि प्रदेश हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील.

वर असलेले तीन पर्याय यात तुम्हाला दिसेल सर्च लँग्वेज, ज्याच्या मदतीने आपण व्हॉईस कमांडची भाषा बदलू शकता. यामध्ये इंग्रजीसह हिंदीचा पर्यायदेखील आहे. एवढेच नाही तर आपण हा प्रदेश देखील बदलू शकता, Google कडून हा पर्याय डीफॉल्ट ठेवलेला असतो. परंतु वापरकर्ते यामध्ये बदल करू शकतात . यानंतर, सर्च लँग्वेज पर्याय खाली आहे, जो कंटेन्टची भाषा सेट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. वापरकर्ते त्यांच्या इच्छेनुसार ते बदलू शकतात.

डेटा सेव्हरने इंटरनेट डाटा वाचवा

गूगलच्या या फीचरमध्ये डेटा सेव्हरचा पर्याय देखील आहे. जो आपण आपल्या इच्छेनुसार चालू किंवा बंद करू शकता. त्यासाठी तुम्हाला सेटींग्सच्या सर्वात वरच्या जनरलच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर चौथ्या क्रमांकावर तुम्हाला डेटा सेव्हरचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

एखादा आवडता विषय कसा निवडायचा

Google डीफॉल्टनुसार आपल्या सर्चच्या आधारावर विषय सेट करते. परंतु तरीही तुमची इच्छा असल्यास त्यामध्ये बदल करू शकता किंवा त्यात इतर विषय जोडू शकता. यासाठी, सेटिंग्जमध्ये दिलेल्या इंटरेस्टच्या पर्यायावर क्लिक करा आणि आपण आपले आवडते टॉपीक बदलू शकता