स्मार्ट TV ला मोबाईलसोबत कसं कराल कनेक्ट? वापरा या Tips

स्मार्ट TV ला मोबाईलसोबत कसं कराल कनेक्ट? वापरा या Tips
Updated on
Summary

या टिप्सच्या मदतीने आपण आता आपल्या नॉन स्मार्ट एलईडी मोबाईलसह सहज कनेक्ट करू शकता.

आजकाल डिजिटल तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण पूर्णपणे गॅझेटने वेढले आहोत. कारण डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला बर्‍याच सोयी दिल्या आहेत. आता आपण कोणत्याही डिव्हाइसवरून सहजपणे एकमेकांना कॉन्टेंट करू शकतो. तसेच तंत्रज्ञान इतके स्मार्ट झाले आहे की आपण मल्टी-डिव्हाइसचा वापर करू शकतो. आता टीव्हीऐवजी स्मार्ट टीव्ही येऊ लागले आहेत. दुसरीकडे, साध्या मोबाइल फोनऐवजी, स्मार्ट फोन आले आहेत.जे सहज टीव्हीसह कनेक्ट केले जाऊ शकतात.जेव्हा आपण मोबाइल फोनमध्ये कोणतीही एक्टिविटी करतो तेव्हा आपण बर्‍याच वेळा विचार केला असेल की टीव्हीमध्ये पाहिल्यास किती मजा येईल? तर आता तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला काही अश्या सोप्या टिप्स सांगणार आहोत की, ज्यामुळे मोबाइल फोन स्मार्ट टीव्हीवर सहजपणे तुम्हाला कनेक्ट करता येईल. चला तर जाणून घेऊया. (how-to-connect-an-your-smart-tv-to-android-mobile-phone-use-tips-in-marathi-news)

असे कनेक्ट करावे?

आजकाल टीव्ही हे जुन्या डिवाइस सारखे नाही राहिले. कारण आता टीव्ही बर्‍याच गोष्टींशी सहज जोडला जाऊ शकतो. आपण पेन ड्राईव्ह, डेटा केबल, वाय-फाय इत्यादीच्या मदतीने कनेक्ट करू शकता. याबरोबर स्मार्ट टीव्हीला कनेक्ट करण्याचे बरेच मार्ग आहेत. परंतु आपला टीव्ही कसा आहे यावर अवलंबून आहे? कारण आजकाल बाजारात प्रामुख्याने 2 प्रकारच्या एलईडी आहेत.

1)स्मार्ट टीव्ही (Smart TV)

2)नॉन-स्मार्ट टीव्ही (Non-Smart TV)

Smart TV- स्मार्ट टीव्ही ही अँड्रॉइड असते. ज्यात बरेच अ‍ॅप्स आधीपासून इंस्टाल केलेले आहेत. हेच कारण आहे की मोबाइल या टीव्हीवर सहजपणे कनेक्ट होतो.

Non-Smart TV - नॉन-स्मार्ट टीव्ही या प्रकारच्या टीव्ही अँड्रॉइड नसतात. म्हणून कोणत्याही मोबाईलशी जोडण्यासाठी USB cable ची आवश्यकता असते.

मोबाइल फोनवर टीव्ही कसा कनेक्ट करावा

कोणत्याही स्मार्ट टीव्हीमध्ये वाय-फाय कनेक्ट करण्याचा निश्चितपणे एक पर्याय असतो. ज्यामुळे आपण आपला मोबाइल कोणत्याही वायरशिवाय टीव्हीवर कनेक्ट करू शकता. फक्त आपल्याला या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

1)सर्वप्रथम आपला टीव्ही चालू करा. आणि नंतर रिमोटचे Exit बटण दाबा. मग आपल्याला एक नोट पर्याय मिळेल त्याला ok करा.

2)यानंतर आपल्या टीव्हीची अँड्रॉइड (Android)सिस्टम उघडेल. आता Settingsवर जा आणि Wireless Display चा पर्याय निवडा.

3) यानंतर आता तुम्हाला मोबाईलची Settings करावी लागेल. यासाठी, आपल्याला फोनच्या Settings वर जावे लागेल. आणि वायरलेस डिस्प्लेचा पर्याय निवडावा लागेल.

4) काही वेळाने आपला मोबाइल टीव्हीसह कनेक्ट होईल. आता आपण मोबाइलवर जे काही पहाल ते देखील टीव्हीवर दिसेल.

मोबाईल फोन वरून नॉन-स्मार्ट टीव्ही असा करा कनेक्ट

1)सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या Settings मध्ये जाऊन USB Debugging ला Enable करा.

2)यानंतर, आपल्याला USB की वायरला टीव्ही आणि मोबाइलशी कनेक्ट करावे लागेल. म्हणजेच एकमेकांशी कनेक्ट करावे लागेल.

3)आता टीव्हीचे Exit बटण दाबा. आणि Menu वर जा. आणि USB Cable चा पर्याय निवडा. आता तुमचा मोबाईल टीव्हीला कनेक्ट होईल.

4) या व्यतिरिक्त आपण मोबाईल आपल्या टीव्हीवर Anycast, Bluetooth, HDMI केबलद्वारे देखील कनेक्ट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com