Windows Activity Tracking : कॉम्पुटर ठेवतोय तुमच्या प्रत्येक हालचालींवर नजर! Windowsबद्दलचं धक्कादायक संशोधन आलं समोर;जाणून घ्या

Computer Threat : मायक्रोसॉफ्टच्या 'Recall' कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित फीचरमुळे निर्माण होऊ शकतो धोका
Prevent Windows from Monitoring Your Activity
Prevent Windows from Monitoring Your Activityesakal
Updated on

Windows Security : आपण आपल्या संगणकावर काय करतोय, हे फक्त आपल्यालाच माहिती आहे असं वाटतं? तर असा विचार करणं आता थांबवा.कारण मायक्रोसॉफ्टच्या Windows ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक गडबड असून ते आपल्या सर्व हालचालींचा रेकॉर्ड ठेवतंय.

हे वाचून थोडा धक्का बसेल पण हे खरं आहे. 'Activity Tracking' नावा हा फीचर आता बंद झालेल्या 'Windows Timeline' या फंक्शनसाठी वापरला जायचा. पण ही सुविधा बंद झाली तरी हा फीचर अजूनही चालू आहे आणि आपण काय करतोय याचा मागोवा घेत आहे. त्याचा रेकॉर्ड स्टोअर करून ठेवला जात आहे.

Prevent Windows from Monitoring Your Activity
Lt Gen Upendra Dwivedi : कोण आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी? भारताच्या नव्या सैन्यप्रमुखांची यशोगाथा

काही दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या येणाऱ्या 'Recall' या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित फीचरवरून खळबळ उडाली होती. कारण हे फीचर आपण आपल्या संगणकावर जे काही करतो त्या सर्व गोष्टींचा शोध घेऊ शकते. यामुळे लोकांनी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांनीही गोपनीयता आणि सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्या आहेत.

अजून काही केल्याशिवाय कंपनी तुमची सर्व माहिती आधीच गोळा करत असण्याची शक्यता आहे. कारण 'Activity Tracking' फीचर अजूनही सुरू आहे.

Prevent Windows from Monitoring Your Activity
Father's Day 2024 : फादर्स डे निमित्त वडिलांना द्या 'हे' खास गिफ्ट; सतत करून देत राहील तुमची आठवण

Windows Activity Tracking बंद कसे करायचे?

पण आता काळजी करण्याची गरज नाही. अगदी सहजपणे हे फीचर बंद करता येतं. फक्त सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी निवडा आणि नंतर 'Activity History' बंद करा. इतकं केल्याने तुमच्या संगणकावरची मागील सर्व माहिती डिलीट होईल आणि पुढेही Windows तुमच्या हालचाली रेकॉर्ड करणार नाही.

एवढं करून आपण आपल्या गोपनीयतेचे रक्षण करू शकता. आता आपण कोणतीही चिंता न करता संगणकावर काम करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com