
Instagram Privacy : इन्स्टाग्रामवरच्या तुमच्या पोस्ट कशा सुरक्षित ठेवाल ?
मुंबई : सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यावर आपण आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतो. अशा वेळी काही कुविचारी व्यक्तींशी आपल्याला सामना करावा लागतो. (how to do privacy settings for instagram )
आपण इन्स्टाग्रामवर शेअर केलेली माहिती इतर कोणी पाहू नये किंवा ठरावीक लोकांनीच पाहावी असं वाटत असेल तर प्रायव्हसी सेटींग्ज करायला आजच शिकून घ्या. हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
अकाऊंट प्रायव्हेट करणे
काही निवडक लोकांनीच आपले फोटो पाहावेत असे वाटत असेल तर तुम्ही तुमचं अकाऊंट प्रायव्हेट करू शकता. हे केल्यानंतर तेच लोक तुमचे प्रोफाईल पाहू शकतील ज्यांची फॉलो रिक्वेस्ट तुम्ही अप्रूव्ह केली आहे.
यासाठी इन्स्टाग्रामच्या सेटींग्जमध्ये जा. तिथे प्रायव्हसीवर क्लिक केल्यावर अकाऊंट प्रायव्हसी पर्याय मिळेल. त्यानंतर प्रायव्हेट अकाऊंटवर पर्याय सुरू करा.
अॅक्टिव्हिटी स्टेटस डिसेबल
तुम्ही ऑनलाइन असताना एक हिरवा बिंदू दिसतो ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन असल्याचे लोकांना कळते. तुम्हाला हे लोकांना कळू द्यायचे नसेल तर अॅक्टिव्हिटी स्टेटस डिसेबल करा.
यासाठी सेटींग्जमध्ये जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा आणि अॅक्टिव्हिटी स्टेटस बंद करा.
ब्लॉक, रिस्ट्रीक्ट आणि रिपोर्ट अकाऊंट्स
काही ठरावीक यूजर्स तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्यापासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकता. संबंधित यूजरच्या प्रोफाईलला जाऊन उजव्या कोपऱ्यातील तीन टिंबांवर क्लिक करा.
येथे तुम्हाला ब्लॉक, रिस्ट्रीक्ट आणि रिपोर्ट अकाऊंट्स असे पर्याय मिळतील. ते तुम्ही सुरू करू शकता.
टर्न ऑफ कमेंट्स
तुमच्या पोस्टवर कोणी निगेटीव्ह करत असेल तर तुम्ही कमेंट्स येणं बंद करू शकता. यासाठी सेटींग्जमध्ये जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा आणि टर्न ऑफ कमेंट्सचा पर्याय सुरू करा.
म्यूट अकाऊंट
जर तुम्हाला एखाद्या यूजरच्या पोस्ट बघायच्या नसतील तर तुम्ही त्याच्या अकाऊंटवर जाऊन म्यूटचा पर्याय निवडू शकता. यामुळे त्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत.