

Instagram Story Edit Feature
sakal
आजकाल Gen Z असो किंवा Millennials, Instagram वर Story टाकायला क्वचितच कोणी चुकतं. सणा-सुदीचे फोटो-व्हिडिओ असोत, मित्रांसोबतचे खास क्षण असोत किंवा फिरायला गेलेल्या ठिकाणचे सुंदर फोटो, प्रत्येक गोष्ट स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली जाते. पण स्टोरी पोस्ट केल्यानंतर एखादा फोटो राहिला, टेक्स्टमध्ये चूक झाली किंवा चुकीचं म्युझिक सिलेक्ट झालं तर? आतापर्यंत अशावेळी संपूर्ण स्टोरी डिलीट करून ती पुन्हा पोस्ट करावी लागत होती. आता मात्र Instagramने यूजर्सची हीच अडचण दूर केली आहे. नवीन फीचरच्या मदतीने स्टोरी पोस्ट केल्यानंतरही त्यात काही बदल करता येणार आहेत.