

How to Find Spy Camera
esakal
Social Media: काही खास क्षण साजरे करण्यासाठी तुम्ही बाहेर गेला असाल किंवा फिरायला गेला असाल तर हॉटेलमध्ये थांबण्याशिवाय पर्याय नसतो. हॉटेलमध्ये आराम, शांतता आणि प्रायव्हसी पाहिजे असते. मात्र काही वर्षांपासून धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. काही हॉटेल्सच्या रुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची प्रकरणं पुढे आलेली आहेत. त्यामुळे लोकांचं खासगी आयुष्य संकटात जातं. काही प्रकरणांमध्ये कपल्सना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडलेले आहेत.