ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? मग चिंता नको, असे मिळवा duplicate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? मग चिंता नको, असे  मिळवा duplicate

ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? मग चिंता नको, असे मिळवा duplicate

इतर कोणत्याही दस्तऐवजाप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. वाहन चालवताना आपल्याला त्याची विशेष गरज असते. पण बऱ्याचदा ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडून हरवतं. अशा स्थितीत वाहनचालकांना वाहन चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बरेच लोक घाबरतात आणि त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी पर्याय शोधू लागतात. या भागामध्ये आज आम्ही तुम्हाला तुमचा हरवलेलं ड्रायव्हिंग लायसन्स पुन्हा कसं मिळवता येऊ शकतं हे सांगणार आहोत. डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गाने सहजपणे करू शकता.

हेही वाचा: Nykaa IPO : फाल्गुनी नायर मालामाल! एका दिवसात 'एवढ्या' कोटींनी वाढली संपत्ती

सर्वप्रथम तुम्हाला हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची एफआयआर नोंदवावी लागेल. डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स बनवताना तुम्हाला याची आवश्यकता असेल. डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य परिवहनच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा आवश्यक तपशील टाकून एलएलडी फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा. तुम्ही हा फॉर्म ऑनलाइनही सबमिट करू शकता. तथापि, तुमचा डुप्लिकेट परवाना ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांनी जारी केलं जाईल.

हेही वाचा: 11 नोव्हेंबरला का साजरा करतात राष्ट्रीय शिक्षण दिन? जाणून घ्या महत्त्व

ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल, त्याची प्रिंट काढा आणि ती तुमच्याकडे ठेवा. जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला वितरित केले जाईल तेव्हा ही पावती आवश्यक असेल. दुसरीकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स येण्यास उशीर होत असेल, तर त्या वेळीही तुम्हाला पावतीची गरज भासेल.

ऑफलाइन प्रक्रियेत, तुम्हाला RTO ला भेट द्यावी लागेल जिथून तुम्ही तुमचं जुनं ड्रायव्हिंग लायसन्स बनवलं आहे. येथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तुमच्या एलएलडी फॉर्मसह विभागाद्वारे निर्धारित शुल्कासह सबमिट करावी लागतील. तुमचं डुप्लिकेट ड्रायव्हिंग परवाना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांनी जारी केलं जाईल.

loading image
go to top