Instagram Safety Tips : इंस्टाग्रामवर कुणीतर तुमचा पाठलाग करतंय? मिनिटांत ओळखा स्टॉकर अन् अकाउंट करा सुरक्षित

Instagram privacy tips stalker alert : कोणत्याही स्टॉकरने आपल्या प्रोफाइलवर नजर ठेवली आहे हे जाणून घेण्याची सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
How to block stalkers on Instagram
Instagram privacy tips stalker alertesakal
Updated on

Instagram stalker alert : आजकाल इंस्टाग्रामचा वापर युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअरिंग, मेसेजिंग आणि व्हॉईस कॉलिंग सारख्या विविध सुविधा आहेत. परंतु, या प्लॅटफॉर्मवर सर्व वापरकर्ते चांगल्या हेतूनेच सक्रिय असतात असे नाही. काही लोक आपल्या फॉलोवर्स लिस्टमध्ये नसूनही आपल्या प्रोफाइलला गुपचुपपणे पाहत असतात आणि आपल्या ऑनलाइन एक्टिविटीवर लक्ष ठेवतात. त्यामुळे, आपल्या प्रोफाइलवरील गोपनीयता टिकवण्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपल्याला कसे ओळखता येईल की कोणत्याही स्टॉकरने आपल्या प्रोफाइलवर नजर ठेवली आहे.

इंस्टाग्राम स्टॉकर कसे ओळखावे आणि ब्लॉक कसे करावे?

1. इंस्टाग्राम अ‍ॅप उघडा

सर्वप्रथम आपल्या इंस्टाग्राम अ‍ॅपला सुरू करा आणि स्क्रीनच्या खालील-उजव्या कोपर्यात असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

2. सेटिंग्समध्ये प्रवेश करा

पुढे, वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन आडव्या रेषांवर (हॅमबर्गर मेन्यू) क्लिक करा आणि "ब्लॉक केलेले" विभाग शोधा.

3. Recommendation पहा

"ब्लॉक केलेले" लिस्टमधून स्क्रोल करा आणि "तुम्ही ब्लॉक करू इच्छित असाल" असा एक पर्याय दिसेल. हे त्या लोकांची यादी आहे, ज्यांनी तुमच्या प्रोफाइलला वारंवार भेट दिली आहे.

4. स्टॉकर ओळखा आणि ब्लॉक करा

या यादीतील कोणताही व्यक्ती संशयास्पद वाटल्यास, तुम्ही त्याला त्वरित ब्लॉक करू शकता. यामुळे तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील.

How to block stalkers on Instagram
APAAR ID : ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’! देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी APAAR ID कार्ड महत्वाचे, कसं बनवून घ्याल? वाचा सोपी प्रोसेस

प्रायव्हसी कायम ठेवा

इंस्टाग्रामवर Meta कडून अनेक गोपनीयता वैशिष्ट्ये दिली गेली गेली आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या डेटाचे संरक्षण करू शकता. या सेटिंग्सचा वापर करून तुम्ही सुनिश्चित करू शकता की, अनोळखी लोक किंवा स्टॉकर तुमच्या प्रोफाइलवरील सक्रियतेचा गैरवापर करू नयेत. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप्स वापरण्याची आवश्यकता नाही.

How to block stalkers on Instagram
Krish Arora IQ : १० वर्षाच्या पोराचा IQ आइन्स्टाईनपेक्षाही जास्त! कोण आहे हा भारतीय वंशाचा भिडू?

इंस्टाग्रामच्या साध्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करू शकता आणि तुमचे प्रोफाइल सुरक्षित ठेवू शकता. तसेच सोशल मिडियाचा वापर करत असताना तुम्ही जास्त सजग राहिले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com