esakal | आता कोणालाच दिसणार नाही Google सर्च हिस्ट्री; जाणून घ्या खास टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

google

तुमची Google सर्च हिस्ट्री कोणाही पाहू नये, असे वाटत असेल तर येथे काही ट्रिक्स देणार आहोत. ज्याच्या मदतीने सर्च हिस्ट्री सुरक्षित राहिल.

आता कोणालाच दिसणार नाही Google सर्च हिस्ट्री; जाणून घ्या टिप्स

sakal_logo
By
अर्चना बनगे

गुगल सर्च: आपण सगळेजणच गुगल (Google) सेवा वापरतो. गुगलच्या प्लॅटफॉर्मवर सर्च हिस्ट्री आणि गुगल असिस्टंट कमांड सारखी संवेदनशील माहिती उपलब्ध आहे. अशाप्रकारचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल पासवर्डची सुविधा आहे. Google सर्च हिस्ट्री (Google Search History) कोणी पाहू नये, असे वाटत असेल तर येथे काही ट्रिक्स देणार आहोत. ज्याच्या मदतीने सर्च हिस्ट्री सुरक्षित राहिल. चला तर जाणून घेऊया.

गुगल सर्च हिस्ट्री पासवर्ड

  • गुगल सर्च हिस्ट्रीला सुरक्षित करण्यासाठी तुमच्या वेब ब्राउजर वर activity.google.com ओपन करा.

  • येथे Manage My Activity Verification ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • त्यानंतर Require Extra Verification ला क्लिक करा. आणि Save ऑप्शनला टॅप करा.

  • यानंतर आपल्या गुगल अकाउंटचा पासवर्ड एंटर करा. एवढे केल्याने तुमची गुगल सर्च हिस्ट्री पासवर्ड सुरक्षित होईल.

  • तुम्हाला जर सर्च हिस्ट्री पासून पासवर्ड काढायचा असेल तर ही प्रोसेस पुन्हा करा.

गुगल सर्च अपडेट

गुगलने अलीकडेच गुगल सर्चच्या अपडेटची घोषणा केली आहे. वापरकर्त्यांना आता स्थानिक क्षेत्राभोवती इतर वेबसाइट तसेच 'जुळवणारे कीवर्ड' आणि 'संबंधित शब्द का पाहत आहेत. हे आधीच कळेल. Mashable इंडियाच्या बातमीनुसार गुगलने सर्च अल्गोरिदमच्या मागील तंत्रज्ञान उघड केले आहे. कंपनीच्या मते, सर्च पॅनल अशाप्रकारे अपग्रेड केले गेले आहे की, वापरकर्त्यांना चांगले परिणाम मिळतील. इतकेच नाही तर पॅनेलच्या माध्यमातून वापरकर्त्यांना चांगले परिणाम शोधण्यासाठी टिप्स दिल्या जातील.

जेव्हा युजर्स गुगलवर काही शोधण्यासाठी सर्च करतील. तेव्हा त्यांना सर्च रिजल्टच्या उजव्या कोपर्‍यात तीन डॉट दिसतील. त्यांच्यावर क्लिक करून, युजर्स About this result पॅनेलमध्ये जातील. जिथे त्यांना निकालाच्या स्त्रोताविषयी माहिती मिळेल. याचा वापरकर्त्यांना खुप फायदा होईल असा कंपनीचा विश्वास आहे.

loading image
go to top