Laptop Safety in Rain : पावसाळ्यात लॅपटॉप सुरक्षित ठेवायचाय? मग 'या' 4 ट्रिक्स माहिती असायलाच हव्यात

Laptop safety tips in monsoon season : पावसाळ्यात तुमच्या लॅपटॉपला आर्द्रता आणि पाण्यापासून वाचवा. सोप्या टिप्स वापरून पावसाळ्यातही तुमच्या डिव्हाईसची योग्य काळजी घ्या
Laptop safety tips in monsoon season
Laptop safety tips in monsoon seasonesakal
Updated on

Laptop safety tips in rainy season : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून पावसाळा सुरू झाला आहे. वातावरणात गारवा आलाय पण हा विषय लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी हा काळ थोडा चिंतेचा असतो. आर्द्रता आणि पावसाच्या पाण्यामुळे लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात तुमच्या लॅपटॉपची किंवा अन्य डिव्हाईसची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी या सोप्या ट्रिक्स जाणून घ्या..

ओलसरपणापासून संरक्षण

पावसाळ्यात हवेत ओलसरपणा खूप वाढतो. हा ओलसरपणा लॅपटॉपच्या आतील भागांसाठी हानिकारक ठरू शकतो. लॅपटॉप खिडकीजवळ किंवा जास्त ओलसर ठिकाणी ठेवणे टाळा. सिलिका जेलचे पाऊच लॅपटॉप बॅगमध्ये ठेवा हे ओलसरपणा शोषून घेण्यास मदत होते.

पाण्याचा संपर्क

ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. लॅपटॉपवर पाणी सांडणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. पाणी पिताना किंवा इतर कोणतेही द्रवपदार्थ वापरताना लॅपटॉपपासून दूर ठेवा. लॅपटॉप बॅगेतून बाहेर काढताना किंवा ठेवतानाही सावध रहा, जेणेकरून पावसाचे पाणी त्यावर पडणार नाहीत.

Laptop safety tips in monsoon season
iPhone 16 Discount Offer : खुशखबर! iPhone 16 स्मार्टफोनवर मिळतोय 42 हजारचा डिस्काउंट; पण असेल फक्त एकच अट, इथे करा खरेदी

योग्य बॅगचा वापर

पावसाळ्यात लॅपटॉप घेऊन बाहेर पडायचे असल्यास वॉटरप्रूफ लॅपटॉप बॅग वापरणे अत्यंत आवश्यक आहे. ही बॅग तुमच्या लॅपटॉपला पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित ठेवेल. जर तुमच्याकडे ही बॅग नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची कॅरिबॅग वापरू शकता

हवेशीर जागा आणि वीज

लॅपटॉप वापरताना तो हवेशीर ठिकाणी ठेवा. खूप गरम किंवा दमट ठिकाणी लॅपटॉप ठेवल्यास नुकसान होऊ शकते.

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना लॅपटॉप सॉकेटमध्ये चार्जिंगला लावणे टाळा. विजेच्या चढ उतारामुळे लॅपटॉपचे नुकसान होऊ शकते.

Laptop safety tips in monsoon season
Netflix Stop Working : नेटफ्लिक्स युजर्ससाठी मोठी बातमी, 'या' टीव्ही अन् डिव्हाइसवर २ जूनपासून नेटफ्लिक्स सेवा बंद होणार!

नियमितपणे लॅपटॉप स्वच्छ करा. धूळ आणि कचरा जमा झाल्यास ते ओलसरपणा होऊ शकतो. कोरड्या आणि मऊ कापडाने लॅपटॉप पुसून घ्या.

या सोप्या टिप्स वापरून तुम्ही पावसाळ्यातही तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता आणि निवांतपणे त्याचा वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com