Lost Phone | हरवलेल्या अँड्रॉइड फोनचा ठावठिकाणा कसा शोधून काढाल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lost Phone

Lost Phone : हरवलेल्या अँड्रॉइड फोनचा ठावठिकाणा कसा शोधून काढाल ?

मुंबई : जेव्हा एखाद्याचा फोन हरवला जातो आणि तो कसा ट्रॅक करायचा हे त्याला कळत नाही तेव्हा ती चिंतेची बाब असते. जर तुम्हाला अशाच समस्येचा सामना करावा लागला असेल तर आज पाहू या की तुम्ही हरवलेला Android फोन कसा ट्रॅक करू शकता.

IMEI नंबर मदत करेल : फोनचा IMEI नंबर खूप महत्वाचा आहे. याद्वारे तुम्ही तुमचा हरवलेला फोन परत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI नंबर माहीत असणे आवश्यक आहे. आता फोन हरवलेला असताना नंबर कसा कळणार ? तर हा नंबर तुम्हाला फोनच्या बॉक्सवर देखील मिळेल.

हेही वाचा: Whats App : 'लाइव्ह लोकेशन' आणि 'करंट लोकेशन'मधील फरक काय ?

मोबाईल ट्रॅकर देखील उपयोगी येईल :

मोबाईल ट्रॅकर तुम्हाला खूप मदत करू शकतो. जर तुम्हाला IMEI नंबर माहित असेल तर तुम्ही मोबाईल ट्रॅकर अॅप वापरून हरवलेल्या फोनचे लोकेशन ट्रॅक करू शकता. तुमचा फोन चोराने बंद केला असला, तरी तुम्ही या नंबरद्वारे फोन शोधू शकाल.

अॅप स्थापित करा :

तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून फोन ट्रॅकर अॅप डाउनलोड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये IMEI नंबर टाकून तुम्ही फोनच्या लोकेशनची माहिती मिळवू शकता. तुम्हाला फोनच्या लोकेशनची माहिती मेसेजद्वारे मिळेल. तुम्ही हा नंबर पोलिसांना देखील देऊ शकता. त्यातून पोलिसांना फोनही ट्रेस करता येतो.

हेही वाचा: Virus : काय आहे Drinik Android Trojan ? २७ बँकांच्या खातेदारांनी राहावे सावध

फोन विनामूल्य ट्रॅक केला जाऊ शकतो ?

ऍपल आणि अँड्रॉइड फोन दोन्ही अंगभूत फाइंड माय सेवेद्वारे ट्रॅक केले जाऊ शकतात. हे तुम्हाला तुमच्या खात्याशी लिंक केलेले फोन ट्रॅक करण्याची क्षमता देते. ही सेवा मोफत आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. तुम्हाला या सेवा फोनमध्ये आधीपासून चालू ठेवाव्या लागतील.

Android फोन ट्रॅक कसा करावा ?

तुमचा Android फोन शोधण्यासाठी Google चा Find My Devices हा सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु हे तेव्हाच कार्य करेल जेव्हा तुम्ही फोनमध्ये ही सेवा आधीच चालू केली असेल. तुमच्या फोनचे लोकेशन शेअरिंग चालू असल्याची खात्री करा. इतर डिव्हाइसवर Google खात्यात लॉग इन करा. यानंतर, तुम्ही शोधत असलेला अँड्रॉइड फोन तुम्हाला गुगल मॅपमध्ये दिसेल.

टॅग्स :android mobiles