UPI Money Transfer Without Internet : फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील करा डिजिटल पेमेंट, जाणून घ्या पध्दत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPI Money Transfer Without Internet

फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील करा डिजिटल पेमेंट, जाणून घ्या पध्दत

UPI Money Transfer Without Internet : आजकाल डिजीटल पेमेंट सगळीकडे वापरले जातायत, मात्र यासाठी तुमच्य फोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असते. मात्र असे बऱ्याचदा होते की इंटरनेटच्या सुरु नसल्यामुळे UPI किंवा Wallet पेमेंट करता येत नाहीत. मात्र आज आपण एक खास आणि अतिशय उपयुक्त ट्रिक जाणून घेणार. ज्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील Google Pay, Phone Pay, Paytm आणि Amazon Pay वापरुन डिजिटल पेमेंट करू शकाल. साधारण फीचर फोनवरून देखील डिजिटल पेमेंट करू शकता.

UPI, ऑनलाई मोड, इंटरनेट नसलेल्या फोनसाठी देखील ही सेवा उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत असे लोक देखील ऑनलाईन पेमेंट करु शकतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरकर्ते *99# डायल करावे लागेल, त्यावर USSD नावाची ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू केली होती. USSD आणि UPI आल्याने वापरकर्ते इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करू शकतात.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

*99# डायल करून करा डिजिटल पेमेंट

1- इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करण्यासाठी, प्रथम सरकारचे BHIM अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि त्यावर रिजीस्टर करावे लागेल. त्यावर UPI अकाउंट रजिस्टर करताना तुमच्या बँक खात्याशी जोडलेला फोन नंबर एंटर करा.

2- फोनवरून *99# डायल केल्यानंतर, तुमच्या फोनच्या स्क्रीनवर 7-पर्याय मेनू दिसतील. यामध्ये सेंड मनी, रिसीव्ह मनी, चेक बॅलन्स, माय प्रोफाइल, पेंडिंग रिक्वेस्ट, ट्रान्झॅक्शन आणि यूपीआय पिनचा पर्याय उपलब्ध आहे.

3- पैसे पाठवण्यासाठी ऑप्शन 1 ने रिप्लाय करा. हे केल्यानंतर तुम्ही UPI आयडी, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड आणि फोन नंबरच्या मदतीने ट्राजेक्शन पूर्ण करू शकता.

4- तुम्ही UPI पर्याय निवडला, तर तुम्हाला ज्या वापरकर्त्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा UPI आयडी टाकावा लागेल. तुम्ही बँक खाते निवडल्यास, तुम्हाला लाभार्थीचा बँक खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड टाकावा लागेल. जर तुम्ही तुम्ही फोन नंबर पर्याय निवडल्यास, तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर एंटर करावा लागेल. यानंतर, तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत तो नंबर टाकाला लागेल.

5- शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला तुमचा UPI पिन टाकून सेंड ऑप्शन क्लिक करावा लागेल. व्यवहार पूर्ण झाल्यावर, व्यवहार पूर्ण झाल्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोन वर येईल या सेवेसाठी तुम्हाला 50 पैसे सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल.

हेही वाचा: 'बुली बाई' नंतर हिंदू महिला टार्गेट; सरकारकडून टेलिग्राम चॅनल ब्लॉक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :digitalUPIDigital Payment
loading image
go to top