ISRO Hackathon : इस्रो देतंय भावी शास्त्रज्ञांसाठी मोठी संधी; विज्ञान क्षेत्रातील 'या' समस्यांवर भरवली जातीये स्पर्धा,असा करा अर्ज

Indian Space Hackathon : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ‘भारतीय अंतराळ हॅकॅथॉन’ आयोजित करत आहे. राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४च्या निमित्ताने हा हॅकॅथॉन होणार आहे. याची प्रक्रिया जाणून घ्या.
Participate in ISRO's Bhartiya Antariksh Hackathon 2024
Participate in ISRO's Bhartiya Antariksh Hackathon 2024esakal

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ‘भारतीय अंतराळ हॅकॅथॉन’ आयोजित करत आहे. राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४च्या निमित्ताने हा हॅकॅथॉन होणार असून, Earth observation application क्षेत्रातील १२ आव्हानात्मक समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले जात आहे.

एनआरएससी, पीआरएल, नेसॅक, एसपीएल आणि एसएसी या इस्रोच्या प्रमुख केंद्रांनी पृथ्वी अवलोकन क्षेत्रातील १२ आव्हानात्मक समस्या जाहीर केल्या आहेत. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएच.डी.च्या भारतीय विद्यार्थी ३ ते ४ जणांच्या गटात सहभागी होऊ शकतात.

Participate in ISRO's Bhartiya Antariksh Hackathon 2024
Asteroid Alert: पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी भारत बजावणार महत्वाची भूमिका, ISRO चीफ सोमनाथ काय म्हणाले?

कशी होणार निवड?

या हॅकॅथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी दोन टप्पांची कठोर निवड प्रक्रिया आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, “प्रारंभिक निवड करताना कल्पनाशक्ती आणि समस्येशी निगडी असलेल्या १०० गटांची निवड केली जाईल. या गटांमधून तज्ज्ञ समिती अंतिम फेरीसाठी ३० गट निवडेल.”

Participate in ISRO's Bhartiya Antariksh Hackathon 2024
Sunita Williams Space Mission: सुनीता विल्यम्सच्या परतीबद्दल नासाने दिली खुशखबर! फक्त एवढ्या दिवसात पृथ्वीवर परतणार अंतराळवीर

अंतिम फेरी कधी आणि कुठे?

३० तासांचा अंतिम फेरीचा कार्यक्रम हा हैदराबाद येथील जीडीमेटला येथील एनआरएससी आउटरिच सुविधेत १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल.

सहभाग कसा घ्यायचा?

या हॅकॅथॉनसाठी एक विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे २६ जुलै २०२४ पर्यंत सहभागी आपले प्रस्ताव सादर करू शकतात. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या गटांची यादी २ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केली जाईल.

तरुण शास्त्रज्ञांनो, भारताच्या अंतराळ क्षेत्रातील विकासात सहभागी होण्याची तरुण शास्त्रज्ञांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. नवीन आव्हाने स्वीकारून तरुण शास्त्रज्ञ त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com