

AC Energy Saving Tips, Summer AC Bill Reduce, Efficient AC Usage
esakal
तुमच्या घराला थंडावा देताना खिशाला आणि सुरक्षिततेला कात्री लागू नये यासाठी काही स्मार्ट टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात एसी ब्लास्ट होण्याचे मुख्य कारण म्हणजे युनिटवर येणारा अतिरिक्त ताण आणि देखभालीचा अभाव. हे टाळण्यासाठी सर्वात पहिली टीप म्हणजे एसीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिर ठेवणे. यामुळे कॉम्प्रेसरवर कमी ताण येतो आणि वीज बिलही लक्षणीयरीत्या कमी होते. तसेच एसी सुरू करण्यापूर्वी खिडक्यांवर गडद रंगाचे पडदे किंवा सन कंट्रोल फिल्म लावल्यास बाहेरची उष्णता आत येत नाही परिणामी एसीला खोली थंड करण्यासाठी कमी मेहनत करावी लागते.