esakal | तुमचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर नेमकं काय करावं?
sakal

बोलून बातमी शोधा

facebook-Hack

तुमचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर नेमकं काय करावं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सध्या बनावट फेसबुक अकाउंट उघडून नामवंत व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्ती असतील त्यांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत अनेक तक्रारी सायबर विभागाने नोंदविण्यात देखील आल्या आहेत. मात्र, आपल्या प्रोफाईलवरून आपले देखील बनावट फेसबुक खाते उघडले तर नेमकं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

हेही वाचा: नागपूरकरांनो, कोरोनाचा प्रकोप ओसरतोय; मृत्यूचा आकडाही कमी

नेमकी कशी होते फसवणूक?

नामवंत डॉक्‍टर, वकील, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नामवंत व्यक्तींचे फेक फेसबुक अकाउंट उघडून त्यांच्या फ्रेण्ड लिस्टमधील मित्र-मैत्रिणी तसेच नातेवाईक यांना सदर फेक फेसबुक अकाउंटवरून फ्रेण्डरिक्वेस्ट पाठविली जाते. सुरुवातीला काही दिवस चॅटिंग सुरू राहते. त्यानंतर विश्‍वास संपादन केल्याचे लक्षात येताच फेक अकाउंटवरून पैशाची अत्यंत गरज असल्याचे भासवून तशी मागणी संबंधितांकडे केली जाते. संबंधित व्यक्ती पैसे पाठविण्यासाठी ऑनलाइन व्यवस्थेचा वापर करण्यास सुचवितात. पैसे येईपर्यंत अकाउंट सुरू ठेवले जाते. शहरातील अनेक मोठ्या व्यक्तींकडून लाखो रुपये लुबाडले गेले. त्यापैकी काहींनी असे प्रकार वारंवार घडत असल्याचे लक्षात घेऊन सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्यानंतर काय करावे?

ज्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले असतील त्यांनी आपल्या स्वतःच्या ओरीजनल अकाउंटवरून बनावट प्रोफाईल शोधावी. तुम्हाला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे त्यांच्याकडून प्रोफाईलची लिंक मागावी. त्या बनावट प्रोफाईलवर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करावे. त्यामध्ये Find support or Report profile हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे. Pretending To Be Someone हे पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्‍लिक करा. पुढे तीन ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity. आपण आपलीच बनविलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्‍ट करा आणि Next करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

सायबर गुन्हेगार सक्रिय झाल्याने सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या अकाउंटच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसे बदल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून करून घ्यावे.
- सीमा दाताळकर, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.