esakal | Google आणि YouTube ची हिस्ट्री अशी लपवा; कोणीही शोधू शकणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Google व YouTube ची हिस्ट्री अशी लपवा; कोणीही शोधू शकणार नाही

Google व YouTube ची हिस्ट्री अशी लपवा; कोणीही शोधू शकणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुगल व यू ट्यूबमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. कोणतीही कोणत्याही गोष्टीचा शोध गुगल व यू ट्यूब घेत (youtube search history) असतो. (Google tips and tricks) अभ्यासापासून ते लहान मोठ्या कामांचा शोध घेण्याचा नागरिकांचा प्रयत्न असतो. सर्वच प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात मिळत असल्यामुळे याचा वापर वाढला आहे. मात्र, गुगल व यू ट्यूबचा वाईट कामासाठीही वापर होऊ लागला आहे. गुगल व यू ट्यूबवर (Google search) आपण काय शोधले याची हिस्ट्री सेव्ह होत असल्यामुळे कोणीही तपासू शकते. मात्र, हे लपवता येणे शक्य आहे. (how-to-secure-your-google-search-history-through-password-no-need-to-delete-it-here-are-full-process)

जगात सर्च इंजीन प्लॅटफॉर्म गुगल व व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबचा सर्वाधिक वापर केला जातो. वापरकर्ते लॅपटॉप, मोबाईलसह बऱ्याच उपकरणांमध्ये याचा वापर करीत आहे. मात्र, याची हिस्ट्री या साइटवर सेव्ह होते. कधीकधी टाईमपास म्हणून काही लोक कोणत्याही गोष्टीचा शोध घेत असतात. हिस्ट्रीवरून ते माहीत होत असल्याने संबंधिताला लाज वाटेल. आता वापरकर्ते संकेतशब्दाद्वारे हिस्ट्री लपवू शकतात. ते कसे हे आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा: वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

सर्च हिस्ट्रीत तयार करा पासवर्ड प्रोटेक्टेड

तुम्ही एखाद्या डिव्हाइसवर लॉग इन केले असेल तर डिव्हाइस चालू असताना कोणीही ऑनलाइन असताना तुम्ही गुगल आणि यु ट्यूबवर काय पाहिले हे पाहू शकतो. तेव्ह तुम्ही सर्च हिस्ट्रीला पासवर्ड प्रोटेक्टेड बनवून अधिक सुरक्षित करू शकता. यासाठी तुम्हाला पडताळणी प्रक्रियेमधून जावे लागेल. गुगल तीन महिने, अठरा महिने आणि ३६ महिन्यांची सर्च हिस्ट्री आपोआप डिलिट करीत असतो.

या स्टेप्सचा करा वापर

वापरकर्त्याने गुगलवर पासवर्ड प्रोटेक्टेड सुरू केला तर कोणतीही सर्च हिस्ट्री पाहण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. वेरिफिकेशन सुरू करण्यासाठी वापरकर्त्याला activity.google.com वर क्लिक करावे लागेल. यानंतर Manage My Activity वेरिफिकेशनवर क्लिक कराव लागेल. तसेच अतिरिक्त सत्यापन पर्यायावर क्लिक करून सेव्ह कराव लागेल. हे झाल्यानंतर पासवर्ड टाकाव लागेल. यानंतर तुमचे गुगल पासवर्ड प्रोटेक्टेड होईल. तुम्ही वेरिफिकेशन सुरू केले नसेल तर activity.google.com वर भेट द्यावी लागेल. इथे तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. इथून वापरकर्त्याला पासवर्ड न टाकता सर्च हिस्ट्रीला डिलीट करता येईल.

(how-to-secure-your-google-search-history-through-password-no-need-to-delete-it-here-are-full-process)