Bumble Free Tips : लगेच प्रीमियम सब्स्क्रिप्शनची गरज नाही, Bumble वर वापरता येतात हे फ्री फीचर्स, कसे कराल अनलॉक?

Bumble Tricks : ऑनलाईन डेटिंग अॅपवर खूप पैसे खर्च होतात. अश्यात पैसे खर्च न करता तुम्ही ऑनलाईन डेटिंग करण्याचे सोपे ट्रिक्स आहेत. Bumble ही अत्याधुनिक डेटिंग अॅप आहे.
Bumble's Free Features and Premium Tricks
Bumble's Free Features and Premium Tricksesakal

Bumble : ऑनलाईन डेटिंग अॅपवर खूप पैसे खर्च होतात. अश्यात पैसे खर्च न करता तुम्ही ऑनलाईन डेटिंग करण्याचे सोपे ट्रिक्स आहेत. Bumble ही अत्याधुनिक डेटिंग अॅप आहे. या अॅपवर तुम्ही मित्र, प्रेमळ जोडीदार आणि अगदी बिझिनेस पार्टनर देखील शोधू शकतात. Bumble ची मोफत सदस्यता घेण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता आणि प्रीमियम सदस्यता घेतल्यास काय फायदे होतात हे जाणून घ्या.

Bumble वर मोफत मध्ये काय करता येतं?

मॅच करा आणि संदेश : लोकांची प्रोफाइल बघणे, तुम्हाला आवडलेल्या व्यक्तींशी मॅच होणे आणि त्यांना संदेश पाठवणे हे Bumble चे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ते पूर्णपणे मोफत आहे.

मर्यादित स्वाइप्स: मोफत अकाऊंट असलेल्या वापरकर्त्यांना एका दिवसात विशिष्ट संख्येपेक्षा जास्त प्रोफाइल स्वाइप करता येत नाहीत. मर्यादा ओलांडल्यानंतर पुढील 24 तास नवीन प्रोफाइल बघण्यासाठी थांबावे लागते.

Bumble's Free Features and Premium Tricks
Call History : क्षणात मिळवा कुणाचीही कॉल हिस्ट्री! जिओ अन् एअरटेलने आणलं नवीन फिचर,कसं वापरायचं जाणून घ्या

मॅचची मुदत वाढवा: एखाद्या व्यक्तीशी मॅच झाल्यानंतर तुम्हाला 24 तासांच्या आत पहिला संदेश पाठवायचा असतो (जर तुम्ही महिला असाल तर). जर तुम्ही वेळेत संदेश पाठवू शकला नाही तर मोफत अकाऊंटवर दररोज एकदा मॅचची मुदत वाढवण्याची सुविधा आहे.

प्रोफाइलमध्ये माहिती आणि आवडीनुसार बॅज जोडा: तुमच्या आवडीनुसार बॅज तुमच्या प्रोफाइलमध्ये जोडून तुमच्या माहिती अधिक सविस्तर करता येते. तुमच्या प्रोफाइलमध्ये जितके जास्त बॅज असतील तितक्या तुमच्या आवडीच्या लोकांना तुमच्याशी मॅच होण्याची शक्यता वाढते. (उदा: शाकाहारी, प्रवासी, कुत्र्यांची आवड)

फिल्टर वापरा: मोफत अकाऊंट असलेले वापरकर्ते लिंग, वय आणि जवळपास असलेल्या लोकांच्या प्रोफाइल बघू शकतात.

Bumble's Free Features and Premium Tricks
Mobile Buying Tips : वनप्लस की सॅमसंग ₹30,000 पेक्षा कमी बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन कोणता? जाणून घ्या

प्रीमियम वैशिष्ट्ये मोफत मध्ये कशी मिळवू?

मोफत ट्रायलसाठी साइन अप करा: नवीन अकाऊंट बनवल्यानंतर Bumble तुम्हाला Bumble Boost किंवा Bumble Premium ची मोफत ट्रायल देऊ शकते. ट्रायल संपण्याआधी सदस्यता रद्द केल्यास तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही.

वेब ब्राउजर वापरून Beeline पहा: मोफत अकाऊंटवर कोणत्या व्यक्तींनी तुम्हाला लाईक केलंय हे जाणण्यासाठी तुम्ही वेब ब्राउजरवर Bumble ची वेबसाइट वापरून ही ट्रिक वापरू शकता.

Bumble सहज, सोपी आणि अत्यंत वापरण्यास सुलभ अशी अॅप आहे. त्यांच्या या मोफत वैशिष्ट्यांचा वापर करून पहा आणि मग पुढे प्रीमियम सदस्यतेचा विचार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com