आधार, पॅनकार्ड सारखे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवा सुरक्षित, ही आहे पध्दत

how to use digilocker
how to use digilocker

सध्याच्या धावपळीच्या काळात डिजीलॉकर (DigiLocker) हे एक अतिशय महत्त्वाचे App बनले आहे. यामध्ये तुम्ही सगळी कागदपत्र सहजपणे एकाच ठिकाणी ठेवू शकता. ही केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) प्लॅटफॉर्म विकसित केलेली क्लाउड सेवा (Cloud Service) आहे. डिजीलॉकरचा वापर सर्व सरकारी दस्तऐवजांच्या डिजिटल आवृत्त्या संग्रहित करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व दस्तऐवज (Documents) नेहमी तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते दाखवू शकता.

हे कसे वापरायचे?

डिजिलॉकर कसे वापरायचे किंवा डिजिलॉकरवर फाइल्स कशा अपलोड करायच्या हे अनेकांना माहीत नाही. तर डिजीलॉकर ऑपरेट करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. डिजीलॉकर प्रत्येक वापरकर्त्याला 1GB क्लाउड स्पेस देतो. प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या सर्व फायलींवर 10MB ची कमाल मर्यादा आहे. गेल्या काही वर्षांत हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, DigiLocker चे 92.28 मिलीयन नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि यावर 4.75 अब्ज दस्तऐवज स्टोअर्स आहेत.

how to use digilocker
कमी किमतीत दमदार फीचर्स, येतोय Moto G22 स्मार्टफोन; पाहा किंमत

DigiLocker मध्ये साइन अप कसे करावे

तुमच्याकडे आधीपासूनच डिजिलॉकर खाते असल्यास तुम्ही पुढील सेक्शनमध्ये जाऊ शकता. नसल्यास, तुम्हाला ते वेबसाइटद्वारे किंवा Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध मोबाइल अॅप वापरून DigiLocker App डाऊनलोज करुन वापरू शकता. एकदा तुम्ही वेबसाइट किंवा अॅपच्या होमपेजवर गेल्यावर तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. पेजच्या वरच्या उजव्या कोपर्यात 'साइन अप' चिन्हावर क्लिक करा.

2. अकाउंट क्रिएशन पेजवर रिडायरेक्ट केल्यानंतर, तुमचे डिटेल्स जसे की, पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी एंटर करा. तुम्हाला तुमच्या आवडीचा 6 अंकी सिक्युरिटी पिन देखील टाकावा लागेल. ते पूर्ण झाल्यावर 'सबमिट' दाबा.

3. आता तुमच्या फोनवर एक OTP येईल. OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

4. आता तुम्हाला युजरनेम टाकावे लागेल. एकदा हे पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा आणि तुमचे खाते वापरण्यासाठी तयार असेल.

नंतर साइन इन करण्यासाठी, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक आणि 6 अंकी सुरक्षा पिन कोड आवश्यक असेल.

DigiLocker मध्ये फाइल अपलोड करण्याची प्रक्रिया वेबसाइट आणि अॅप दोन्हीवर सारखीच असते. फायली अपलोड करण्यासाठी, फक्त डिजिलॉकरला अॅप व्हर्जनमध्ये तुमच्या फाइल्समध्ये एक्सेस साठी परवानगी द्या. डिजिलॉकरवर सहजपणे फाइल अपलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

how to use digilocker
Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

डिजीलॉकर मध्ये फाइल कशी अपलोड करावी

1 एकदा तुम्ही प्लॅटफॉर्मवर साइन इन केल्यानंतर तुम्हाला दस्तऐवज अपलोड करण्यासाठी एक आयकॉन दिसेल. ते अॅपच्या वरती डावीकडे देलेले असेल. यावर क्लिक करा.

2 आता पुढील स्क्रीनवर 'अपलोड' चे आयकॉन दिसेल. यावर क्लिक करा.

3 तुम्हाला डिजिलॉकरवर अपलोड करायच्या असलेल्या फाइल्स निवडा आणि 'ओपन' वर क्लिक करून त्या जोडा.

4 हे केल्यावर तुमचे काम होईल. तुमची कागदपत्रे डिजिलॉकरवर अपलोड करण्यात येतील. आता तुमच्याकडे इंटरनेट आहे तोपर्यंत तुम्ही कधीही ते पाहू शकता.

how to use digilocker
Realme चे दोन नवीन स्मार्टफोन; मिळेल दमदार कॅमेरा अन् अनेक भन्नाट फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com