लॅपटॉपमध्ये Threads ऍप वापरायचंय, मग या स्टेप फॉलो करा

वेब विंडोमध्ये तुम्ही काही स्टेप्सच्या मदतीने थ्रेड्स ऑपरेट करू शकता. अर्थात यासाठी सर्वप्रथम तुमचं इंन्स्टाग्राम अकाऊंट Instagram Account असणं गरजेचं आहे. कारण इन्स्टाग्राम आयडीच्या मदतीने तुम्ही थ्रेड्सचं लॉगिन करू शकता
लॅपटाॅपमध्ये थ्रेडस वापरण्यासाठी
लॅपटाॅपमध्ये थ्रेडस वापरण्यासाठीEsakal

ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटाने थ्रेड्स Threads हे आपलं नवं टेक्स अप लॉन्च केलं आहे. हे ऍप लॉन्च झाल्यानंतर ५ दिवसांमध्ये ऍपची युजर संख्या १०० मिलियनहून जास्त झाली आहे. दिवसेंदिवस युजर्सच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. How to use Meta Threads on Instagram

मेटाने १०० बून अधिक देशांमध्ये Threads ऍप लॉन्च केलं आहे. सध्या एँड्रॉइड आणि iOS साठी हे ऍप लॉन्च करण्यात आलं आहे. अद्याप Threadsचं वेब वर्जन लॉन्च झालेलं नाही. त्यामुळे केवळ मोबाईलवरच युजर्स हे ऍप वापरू शकतात. मात्र असं असंल तर आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही लॅपटॉप Laptop किंवा डेस्कटॉपवर हे ऍप वापरू शकता.

वेब विंडोमध्ये तुम्ही काही स्टेप्सच्या मदतीने थ्रेड्स ऑपरेट करू शकता. अर्थात यासाठी सर्वप्रथम तुमचं इंन्स्टाग्राम अकाऊंट Instagram Account असणं गरजेचं आहे. कारण इन्स्टाग्राम आयडीच्या मदतीने तुम्ही थ्रेड्सचं लॉगिन करू शकता.

डेस्कटॉपवर वापरा थ्रेड्स

१.लॅपटॉपमध्ये थ्रेड्स वापरण्यासाठी तुम्हाला थ्रेड्सची APK फाईल डाउनलोड करावी लागेल. तसचं मायक्रोसॉफ्ट स्टोरमधून WSATools ऍप देखील डाउनलोड करावं लागेल.

२. त्यानंतर विंडो सब-सिस्टम फॉर एंड्रॉइड ऍप ओपन करा. इथं असलेल्या डेव्हलपर्समोडवर क्लिक करून ते ऑन करा.

३. यानंतर WSA टूल ऍप्लिकेशन ओपन करा त्यानंतर सर्व प्रॉम्प्ट्स पूर्ण करा.

४. आता थ्रेड्स ऍप लोकेट करून इंन्स्टॉल करा.

५. थ्रेड्स इंन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ते सहज लॅपटॉपमध्ये वापरू सकता.

हे देखिल वाचा-

लॅपटाॅपमध्ये थ्रेडस वापरण्यासाठी
Threads New Features : यूजर्सची गळती थांबवण्यासाठी थ्रेड्सने आणले नवीन फीचर्स; लवकरच येणार वेब व्हर्जन

ऍपशिवाय पहा थ्रेड्सवरील प्रोफाईल

जरी तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर थ्रेड्स डाऊनलोड करू शकत नसाल करी तुम्ही थ्रेड्सवरील एखाद्या व्यक्तीची प्रोफाईल मात्र नक्की पाहू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या ब्राउझर वरून एखाद्या व्यक्तीला थ्रेड्सवर शोधू शकता आणि त्याची प्रोफाईल पाहू शकता. अर्थात यासाठी प्रोफाईल पब्लिक असणं गरजेचं आहे.

तुम्ही त्यांनी कोणते फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केले आहेत हे पाहू शकता. प्रोफाईल लिंक कॉपी करू शकता. मात्र तुम्ही पोस्टवर कमेंट करू शकतं नाही किंवा पोस्ट लाईक करू शकत नाही.

तसचं तुम्ही विंडोज आणि मॅकसाठी उपलब्ध असलेल्या ब्लूस्टॅक्स एमुलेटर ऍपच्या मदतीने देखील डेस्कटॉपवर थ्रेड वापरू शकता. या ऍपच्या मदतीने एँड्राइड ऍप्स तुम्ही डेस्कटॉपवर सहजपणे वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com