
टेक कंपनी Apple ने अलीकडेच iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे आणि त्यात अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, यातील एक बदल युजर्सच्या अडचणी वाढवू शकतो. Apple ने नवीन सीरीजमधून सिम कार्ड ट्रे काढून टाकला आहे, याचा अर्थ वापरकर्त्यांना नवीन मॉडेल्समध्ये सिम कार्ड घालण्याचा पर्याय दिला जाणार नाही. युजर्सनी फक्त ई-सिम वापरावे अशी कंपनीची इच्छा आहे.
लॉन्च इव्हेंट दरम्यान, Apple ने iPhone 14 सीरीज पूर्णपणे ई-सिमवर आधारित असेल आणि फिजीकल सिम कार्ड वापरता येणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे हा बदल आत्तापर्यंत फक्त यूएसमध्येच करण्यात आला आहे आणि भारतीय वापरकर्त्यांना याची काळजी करण्याची गरज नाही.
Apple ने सिम कार्ड ट्रे का काढला?
Apple ने आयफोनच्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले आहेत, आधी फोनमधून 3.5mm ऑडिओ जॅक काढून टाकण्यात आला आणि नंतर टच आयडी काढून फेस आयडी आणण्यात आले. कंपनीला कमीत कमी होल्स आणि पोर्ट्स असलेले क्लिन डिव्हायसेस बनवायचे आहेत. याचाच भाग म्हणून कंपनी आता फोनमधून सिम कार्ड ट्रे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आता कॉलिंग आणि इतर कामे कशी होणार?
फिजीकल सिम कार्ड ट्रे देण्यात येण्यात नसल्याने वापरकर्ते प्लास्टिकचे सिम कार्ड वापरू शकणार नाहीत. त्यांना टेलिकॉम ऑपरेटरकडून ई-सिम घ्यावे लागेल, जे फोनमध्ये कोणतेही कार्ड न घालता कोणताही नंबर वापरण्याची परवानगी देते. हे तंत्रज्ञान सध्याच्या आयफोन मॉडेल्समध्ये आहे, परंतु त्यामध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड देखील इंस्टॉल केले जाऊ शकते.
हा पर्याय भारतातही उपलब्ध आहे का?
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्या भारतात ई-सिमचा पर्याय देतात. यासाठी, तुम्ही जवळच्या स्टोअरला भेट दिल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर किंवा घरी बसून केवायसीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर Apple किंवा इतर प्रीमियम डिव्हाइसमध्ये ई-सिम सक्रिय करू शकाल. मात्र, वारंवार सिमकार्ड बदलणाऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान अडचणीचे ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.