

HP ZBook Ultra G3a Launched in India: Price, Specs & AI Features
esakal
HP ZBook Ultra G3a Launched in India: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचपी (HP) ने भारतीय बाजारात आपला प्रीमियम लॅपटॉप लाँच केला आहे. एचपीचा हा नवीन लॅपटॉप ZBook Ultra G3a या नावाने बाजारात आणण्यात आला आहे. हा लॅपटॉप फक्त दिसायला स्लिम आणि हलका आहे असे नाही, तर यात आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्सचा खजिना देण्यात आला आहे. विशेषतः भारी स्वरूपाचे काम करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्स, व्हिडिओ एडिटर्स आणि गेमर्ससाठी हा लॅपटॉप एक उत्तम पर्याय ठरू शकतो. भारतीय बाजारातील या नव्या प्रीमियम लॅपटॉपचे फीचर्स, किंमत आणि इतर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.