Baleno
BalenoSakal

Car Offer: Maruti च्या 'या' कारला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लागली रांग, २० हजार रुपये स्वस्तात करा खरेदी

मारुती सुझुकीच्या बलेनो या प्रीमियम हॅचबॅक कारवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. डिसेंबर महिन्यात या कारला स्वस्तात खरेदी करू शकता.

Maruti Suzuki Car Offer: वर्षाखेर अनेक कंपन्या आपल्या नवीन कार्सवर बंपर डिस्काउंट देत असतात. तुम्ही देखील २०२३ हे वर्ष नवीन गाडीसह साजरे करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. जुनी कार देऊन तुम्ही कमी किंमतीत नवीन कार खरेदी करू शकता. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेली Maruti Suzuki आपल्या कारवर आकर्षक ऑफर देत आहे. कंपनीच्या कारवर तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Maruti Suzuki Baleno वर मिळेल बंपर डिस्काउंट

मारुती सुझुकीची Baleno नोव्हेंबर महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. नोव्हेंबर महिन्यात कारच्या २०००० यूनिट्सची विक्री झाली आहे. ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक असून, याची विक्री नेक्सा डीलरशिपच्या माध्यमातून होते. कंपनीच्या या कारला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. डिसेंबर महिन्यात मारुती सुझुकी बलेनोला खरेदी केल्यास २० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.

काय आहे एक्सचेंज ऑफर

मारुती सुझुकी डिसेंबर महिन्यात Baleno च्या सर्व मॅन्यूअल व्हेरिएंट्सवर २०,००० रुपये डिस्काउंट देत आहे. यामध्ये १० हजार रुपये कंझ्यूमर ऑफरचा समावेश आहे. याशिवाय, जुन्या कारवर १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. मात्र, लक्षात घ्या की, मारुती सुझुकी AGS वर कोणतीच ऑफर देत नाहीये.

Baleno
Mobile Recharge: Jio-Airtel-Vi चे भन्नाट प्लॅन्स, दररोज २जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे; पाहा किंमत

Maruti Suzuki Baleno ची किंमत

Maruti Suzuki Baleno ची एख्स-शोरुम किंमत ६.४९ लाख रुपये आहे. तर कारच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत ९.७१ लाख रुपये आहे. मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच बलेनो कारचे सीएनजी मॉडेल भारतात लाँच केले आहे. कारचे सीएनजी मॉडेल दोन व्हेरिएंट्समध्ये येते. भारतीय बाजारात कारच्या सीएनजी मॉडेलची सुरुवाती एक्स-शोरुम किंमत ८.२८ लाख रुपये आहे. बलेनो एस-सीएनजी मॉडेलमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे ६००० आरपीएमवर ७६ बीएचपी मॅक्सिमम पॉवर आणि ४३०० आरपीएमवर ९८.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड ट्रान्समिशनसह येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com