Idea युजर्सना व्होडाफोन देणार Netflix, Amazon Prime चा अॅक्सेस

idea vodafone
idea vodafone

नवी दिल्ली- टेलिकॉम कंपनी आडियाने त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवून सांगितलं आहे की, 29 जूनपासून त्यांच्या निर्वाण पोस्टपेडच्या सर्व ग्राहकांचे कनेक्शन व्होडाफोन रेडमध्ये शिफ्ट केलं जाईल. कंपनीने म्हटलं आहे की, 29 जूनपासून बिलिंग सिस्टिममध्ये बदल केला जाणार आहे. आयडिया निर्वाण पोस्टपेड ग्राहकांचे कनेक्शन ऑटोमेटिक व्होडाफोनमध्ये शिफ्ट केलं जाईल. त्यानंतर ग्राहकांना सध्याचे प्लॅन आहे तसे व्होडाफोन रेडमध्येही मिळतील. 

आयडियाने पाठवलेल्या मेसेजमध्ये असंही स्पष्ट केलं आहे की, व्होडाफोन रेडमध्ये शिफ्ट झाल्यानंतर आयडिया निर्वाण पोस्टपेडच्या ग्राहकांचा सध्याचा प्लॅन, सिम, नंबर यात कोणताही बदल केला जाणार नाही. तसंच व्होडाफोन रेडमध्ये शिफ्ट झाल्यानंतर ग्राहकांना काही अधिकच्या सेवाही मिळतील. यामध्ये REDX, 80 देशांमधील इंटरनॅशनल रोमिंग सुविधा यांचा समावेश आहे. निर्वाणच्या ग्राहकांना देशात अडीच हजारांहून जास्त असेलेल्या व्होडाफोन आणि आयडियाच्या स्टोअरमध्ये फ्रीमध्ये सेवा मिळेल. 

कंपनीने अशीही माहिती दिली की, शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्या ग्राहकांना Netflix आणि  Amazon Prime चा अॅक्सेसही मिळेल. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी या ग्राहकांना व्होडाफोनच्या साइटवर जावं लागेल. तसंच व्होडाफोन अॅपचाही वापर करता येईल. यापुढे निर्वाण पोस्टपेडच्या ग्राहकांना कस्टमर केअरशी बोलण्यासाठी 199 नंबरवर कॉल करावा लागेल. व्होडाफोन आणि आयडिया एकत्र झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी पोस्टपेड सर्व्हिसेस वेगवेगळी ऑफर केली जात होती.

आयडिया त्यांच्या ग्राहकांना 399 आणि 499 रुपयांच्या दोन निर्वाण पोस्टपेड प्लॅन ऑफर देते. त्यात 399 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 40 जीबी डेटा आणि 100 एसएमस मिळातत. तर 499 रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह 75 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. आता या सुविधा व्होडाफोन रेडच्या माध्यमातून मिळणार आहेत. याबद्दल अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कंपनीने www.ideacellular.com/hellovodafone4 या संकेतस्थळाला भेट देण्यास सांगितलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com