तुमचा WhatsApp DP कोणी चोरून लपून पाहत तर नाही ना? या सोप्या पद्धतीने तपासा

If someone is stealing your WhatsApp DP Nagpur news
If someone is stealing your WhatsApp DP Nagpur news

नागपूर : व्हॉट्सॲप हा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आजच्या घडीला व्हॉट्सॲप न वापरणारा व्यक्ती सापडणे कठीणच. यावर आजचा युवावर्ग अधिकांश वेळ घालवत असतो. हा संपर्क साधण्याचा सर्वाधिक चांगला मार्ग झाला आहे. एकमेकांना कोणत्या गोष्टी पोहोचण्यापासून चॅटिंगचा उत्तम असा पर्याय आहे. मात्र, फेसबुकप्रमाणे व्हॉट्सॲपवरही चोरून लपून प्रोफाईल पाहणाऱ्यांची कमी नाही. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो आपली प्रोफाईल कोणी पाहिला असेल किंवा कोणता व्यक्ती प्रोफाईल नेहमी स्टॉक करीत असेल. आज आपण तुमचा प्रोफाईल कोणी पाहिली हे आपण कसे तपासाचे हे पाहणार आहोत.

आपल्या मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर सेव्ह असतात. काही खासगी तर काही ऑफिशीयल कामाचे नंबर असतात. भविष्यात याचे काम पडेल म्हणून आपण ते नंबर सेव्ह करून ठेवत असतो. अशाच काही नंबरपासून आपल्याला धोका असतो. काही लोक आपल्या व्हॉट्सॲप प्रोफाईल फोटोवर लक्ष ठेवून असतात. कारण, व्हॉट्सॲपवर ओळखीसाठी डिस्प्ले पिक्चर (डीपी) ठेवावा लागतो.

काही लोक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अभिनेता, अभिनेत्री किंवा दुसरे कोणते फोटो ठेवत असतात. तर काही लोक याचा विचार न करता स्वतःचा किंवा आपल्या मुलांचा फोटो ठेवतात. ते बाकी गोष्टींचा विचार करीत नाही. याच संधीकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. ते लपून दुसऱ्याचे डीपी पाहत असतात. मात्र, याची आपल्याला तिळमात्रही कल्पना नसते. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर लक्ष ठेवून आहे का? आणि असेल तर ते कसे ओळखायचे.

या ॲपचा करा वापर

तुमचा डिस्प्ले पिक्चर (डीपी) कोण पहात आहे हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तृतीय पक्षाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यासाठी Play Store वर जाऊन व्हॉट्सॲप-हू व्ह्यू मी किंवा व्हॉट्स ट्रॅकर अ‍ॅप (WhatsApp- Who Viewed Me या Whats Tracker) डाउनलोड करावे लागेल. तसेच एक मोबाइल बाजारपेठ ॲप डाउनलोड करावे लागेल. ते डाउनलोड केल्याशिवाय हू व्ह्यू मी ॲप डाउनलोड होणार नाही. व्हॉट्सॲप-हू व्ह्यू मी ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो पाहणारे कोण? हे तपासू शकता.

फक्त चोवीस तासांची मिळणार माहिती

अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला अशा लोकांची यादी दिसेल ज्यांनी तुमचा व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल फोटो पाहिला आहे. मात्र, तुम्हाला मागील चोवीस तासांत तुमचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी पाहणाऱ्यांची यादी मिळेल.

सुरक्षा महत्त्वाची

सध्या फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याच नावाने बवानट अकाऊंट तयार करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. तुमच्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून दुसरे अकाऊंट तयार करायचे आणि लोकांना गंडा घालायचा हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. असे लोक व्हॉट्सअ‍ॅप डीपीवरील फोटोंचाही वापर करू शकतात. तेव्हा सुरक्षेचे दृष्टीने आपले फोटो डीपीवर ठेवणे टाळलेलेच बरे.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com