
नवी दिल्ली, ता. १३ (पीटीआय) ः लेझर संचालित ऊर्जाअस्त्र प्रणालीची (लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपन सिस्टीम) यशस्वी चाचणी भारताने आज घेतली. यामुळे अमेरिका, चीन व रशिया या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे.आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे ही चाचणी घेण्यात आली.