Online Gaming Safety Tips : ऑनलाईन गेमर्सना केंद्राने दिला गंभीर इशारा, सुरक्षेसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स!

स्मार्टफोन गेमर्सना पैसे कमावण्याचं आमिष दाखवून त्यांना काही लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येतं. यानंतर यूजर्सचा सर्व डेटा, त्यांचं गेमिंग अकाउंट आणि त्यात असणारे पैसेदेखील हॅकर्सच्या ताब्यात जातात.
Online Gaming Tips
Online Gaming TipseSakal

Home Ministry Safety Tips for Gamers : भारतात गेमिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ शहरांमध्येच नाही, तर छोट्या गावांमध्येही कित्येक गेमर्स तयार होत आहेत. मात्र, याचाच फायदा काही सायबर गुन्हेगार देखील घेत आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्याचं किंवा इतर गोष्टींचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. यामुळेच देशाच्या गृह मंत्रालयाने गेमर्सना काही टिप्स दिल्या आहेत.

गृह मंत्रालयाच्या सायबर विभागाने ऑनलाईन गेम खेळणाऱ्या यूजर्सना इशारा दिला आहे. गेमिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावं असं गेमर्सना सांगण्यात येत आहे. हा इशारा विशेषतः स्मार्टफोनवर गेमिंग करणाऱ्यांसाठी आहे.

स्मार्टफोन गेमर्सना पैसे कमावण्याचं आमिष दाखवून त्यांना काही लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येतं. यानंतर यूजर्सचा सर्व डेटा, त्यांचं गेमिंग अकाउंट आणि पर्यायाने त्यात असणारे पैसेदेखील हॅकर्सच्या ताब्यात जातात. कित्येक प्रकरणांमध्ये यूजर्सचे बँक डीटेल्स चोरीला जाऊन मोठी फसवणूक झाल्याचंही समोर आलं आहे. यामुळेच सरकारने गेमर्सना काही टिप्सही दिल्या आहेत.

Online Gaming Tips
Microsoft Layoff : अ‍ॅक्टिव्हिजन ब्लिझार्ड आणि एक्सबॉक्समधील तब्बल 1,900 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय - रिपोर्ट

ऑनलाईन गेमर्सना टिप्स

  • कोणत्याही ऑनलाईन गेमला केवळ अधिकृत वेबसाईट, गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

  • ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या गेमची वेबसाईट आणि पब्लिशर याबाबत माहिती घ्या.

  • कोणतेही अ‍ॅप सुरू केल्यानंतर ते आपल्या मोबाईलमधील काही गोष्टींचा अ‍ॅक्सेस मागते. अशा वेळी केवळ त्याच गोष्टींचा अ‍ॅक्सेस द्या ज्या गेमिंगसाठी गरजेच्या आहेत.

  • गेमिंग अ‍ॅप खरेदी करताना योग्य लिंकवर क्लिक केलं आहे याची खातरजमा करा. कित्येक वेळा नकली सबस्क्रिप्शन लिंकवर क्लिक केलं जाऊन फसवणूक होऊ शकते.

  • ऑनलाईन मल्टिप्लेअर गेम्स खेळताना समोरच्या अनोळखी प्लेअरसोबत चॅट करताना आपली खासगी माहिती त्यांना देऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com