Smartphone Market India : देशातील स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी घट; सॅमसंगला बसला फटका! चिनी कंपन्या मात्र जोमात

Smartphone Market : यावर्षी आयात झालेल्या स्मार्टफोन्समध्ये सर्वाधिक वाटा व्हिवोचा असल्याचं समोर आलं आहे.
Smartphone Market India
Smartphone Market IndiaeSakal

देशातील स्मार्टफोन मार्केटमध्ये घट होत असल्याचं एका संस्थेच्या अहवालात समोर आलं आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्परेशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत 10 टक्के कमी स्मार्टफोन्सची आयात झाली.

2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 64 मिलियन स्मार्टफोन्सची देशात आयात करण्यात आली. ही संख्या 2022 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर्षी आयात झालेल्या स्मार्टफोन्समध्ये सर्वाधिक वाटा व्हिवोचा असल्याचंही समोर आलं आहे.

Smartphone Market India
Jio Affordable 5G Smartphone: जिओ आणणार सर्वात स्वस्त 5G मोबाईल! 28 ऑगस्टला होऊ शकते मोठी घोषणा

सॅमसंगला मोठा दणका

आतापर्यंत देशातील स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंग आणि श्याओमीचा दबदबा होता. मात्र, यंदा व्हिवोने या दोघांनाही मागं टाकलं आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये झालेल्या एकूण स्मार्टफोन आयातीपैकी 16 टक्के वाटा व्हिवोचा होता. त्यानंतर 15.7 टक्क्यांसह सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर होतं. आयडीसीच्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

दुसऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार, याच कालावधीमधील स्मार्टफोन आयातीत व्हिवोचा शेअर 17.5 टक्के होता. तर श्याओमी (16 टक्के) दुसऱ्या आणि सॅमसंग (15.5 टक्के) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Smartphone Market India
Redmi 12 : श्याओमीचं मोठं गिफ्ट! अवघ्या 8,999 रुपयांना लाँच केला 'रेडमी 12' स्मार्टफोन; 4 ऑगस्टपासून विक्री

अ‍ॅपल-वनप्लसची मोठी झेप

अ‍ॅपलच्या स्मार्टफोन विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 61.1 टक्के वाढ दिसून आली. एकूण स्मार्टफोन मार्केटपैकी अ‍ॅपलचा वाटा 5.5 टक्के होता. दुसरीकडे वनप्लसच्या स्मार्टफोन विक्रीमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत 61.1 टक्के वाढ दिसून आली. एकूण मार्केटपैकी वनप्लसचा वाटा 7.2 टक्के राहिला.

5G स्मार्टफोनला मागणी वाढली

एकूण स्मार्टफोनच्या मागणीत घट झाली असली, तरीही 5G स्मार्टफोनच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली. 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये 5G स्मार्टफोनचं मार्केट शेअर 31 टक्के होतं. जे 2023 च्या एप्रिल-जून तिमाहीत 47 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

Smartphone Market India
Mobile Tips : तुटलेल्या स्क्रीनचा स्मार्टफोन वापरणं ठरू शकतं घातक! आजच बदलून घ्या मोबाईलचा डिस्प्ले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com