
Indian Startups in Space Industry: अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील ‘पिक्सेल स्पेस’ आणि ‘ध्रुव स्पेस’ या दोन ‘स्टार्ट अप’ कंपन्यांनी बुधवारी (ता. २७) कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन-९’ रॉकेटद्वारे उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ‘पिक्सेल स्पेस’च्या तीन ‘फायरफ्लाय’ उपग्रहांच्या प्रक्षेपणाने पृथ्वीचे अधिक जवळून आणि स्पष्ट निरीक्षण करता येईल. शेतीतील पिकांची स्थिती, प्रदूषणाची पातळी, वायुगळती अशा प्रकारचे निरीक्षण करण्यासाठी या उपग्रहांचा उपयोग होणार आहे.