Infinix Note 12 : मिळेल 108 मेगापिक्सेल कॅमेरासह फास्ट चार्जिंग

infinix note 12 5g and note 12 pro 5g launched in india with 108 mp camera powerful battery
infinix note 12 5g and note 12 pro 5g launched in india with 108 mp camera powerful battery

Infinix Note 12 series launched : कमी किंमतीत चांगला फोन शोधत असाल तर आज Infinix ने भारतात Note 12 5G सीरीज लॉन्च केली आहे. ज्यामध्ये Note 12 5G सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत, जे Note 12 5G आणि Note 12 Pro 5G आहेत. दोन्ही फोनमधील बहुतांश हार्डवेअर समान आहेत. परंतु Note 12 Pro 5G मध्ये हाय रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन आहे, तसेच मागील बाजूस 108MP ट्रिपल-कॅमेरा दिला आहे.

या दोन्ही फोनमध्ये MediaTek डायमेंशन प्रोसेसर दिले आहे .तसेच समोर वॉटरड्रॉप नॉचसह AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच नुकतेच लाँच केलेले दोन्ही स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतात. भारतातील Infinix Note 12 5G सिरीजची किंमत, फीचर्स आणि विक्री ऑफरवर एक नजर टाकूया.

किंमत किती असेल?

Infinix Note 12 Pro 5G आणि Infinix Note 12 5G च्या किंमती आणि ऑफरर्सबद्दल बोलायचे झाले तर, Infinix Note 12 Pro 5G ची किंमत 17,999 रुपये आहे तर Infinix Note 12 5G ची भारतात किंमत 14,999 रुपये आहे. हे दोन्ही फोन भारतात 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Infinix आपल्या Infinix Note 12 5G सीरीज स्मार्टफोनच्या लॉन्चवर अनेक ऑफर्स देत आहे. Infinix Note 12 Pro 5G ची प्री-ऑर्डर करणार्‍या ग्राहकांना कंपनी रु. 1,000 आणि Axis Bank कार्ड वापरून पेमेंट करणार्‍यांना रु. 1,500 ची सूट देत आहे. या ऑफरसह, Infinix Note 12 Pro 5G ची किंमत 15,499 रुपयांपर्यंत खाली येईल.

त्याचप्रमाणे, Infinix Note 12 5G ची प्री-ऑर्डर करणार्‍या ग्राहकांना रु. 500 ची सूट मिळेल आणि जे ग्राहक त्यांचे Axis Bank कार्ड वापरून पेमेंट करतात त्यांना रु. 1,500 ची सूट मिळेल. यासह, Infinix Note 12 5G ची किंमत 12,999 रुपयांपर्यंत खाली येईल.

infinix note 12 5g and note 12 pro 5g launched in india with 108 mp camera powerful battery
Nothing Phone 1 खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टवर आहे जबरदस्त ऑफर

Infinix Note 12 Pro 5G स्पेसिफिकेशन्स

फोन 1,080×2,400 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 700 नाइट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास 3 सह येतो. त्याच्या मागील पॅनलवर मॅट फिनिश दिला आहे. हे 8GB LPDDR4x रॅम, 13GB डायनॅमिक रॅम आणि 128GB स्टोरेज स्पेससह 6nm MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर यासोबत येतो.

Infinix Note 12 Pro 5G मध्ये क्वाड LED फ्लॅशसह 108MP ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आणि ड्युअल LED फ्लॅशसह 16MP सेल्फी कॅमेरा येतो. तसेच या फोनला 33W टाइप-सी फास्ट चार्जरसह 5,000mAh बॅटरी दिली आहे, जो एक तास 30 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.

infinix note 12 5g and note 12 pro 5g launched in india with 108 mp camera powerful battery
आज लाँच झाली TVS Ronin, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Infinix Note 12 5G चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 12 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन दिले आहे. हे MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर द्वारे समर्थित आहे. MediaTek च्या HyperEngine 2.0 सह 8GB LPDDR4x रॅम, 13GB डायनेमिक रॅम आणि 64GB स्टोरेज स्पेस सह येते.

फोन क्वाड एलईडी फ्लॅशसह 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसह 16MP सेल्फी कॅमेरासह येतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 33W टाइप-सी फास्ट चार्जरसह 5,000mAh बॅटरी आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com