Infinix phone : उत्कृष्ट गेमिंग अनुभवासाठी 'नोट १२ प्रो' लॉन्च

१४,९९९ रूपये या आकर्षक किंमतीमध्ये नवीन नोट १२ प्रो व्होल्कॅनिक ग्रे, टुस्कानी ब्ल्यू, अल्पाइन व्हाइट या तीन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल.
Infinix phone
Infinix phonegoogle

मुंबई : इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने गेम-चेजिंग नोट १२ प्रो लॉन्च केला आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्जनशील क्षमतांना वाव देऊ शकता. काही असाधारण वैशिष्ट्ये जसे सर्वात बळकट चिपसेट, सर्वात प्रखर डिस्प्ले, गतीशील कॅमेरा व अपवादात्मक स्टोरेज क्षमता असलेल्या या स्मार्टफोनचा गेमिंग कार्यक्षमता वाढवत युजर्सना अद्वितीय अनुभव देण्याचा मनसुबा आहे.

१४,९९९ रूपये या आकर्षक किंमतीमध्ये नवीन नोट १२ प्रो व्होल्कॅनिक ग्रे, टुस्कानी ब्ल्यू, अल्पाइन व्हाइट या तीन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. तसेच ग्राहकांना प्रत्येक हँडसेट्ससोबत १ रूपयामध्ये १०९९ रूपये किंमतीचा स्नॉकर एक्सई १८ टीडब्ल्यूस देखील मिळेल. ७ डेज रिटर्न कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्नॉकरची किंमत १ रूपया असेल.

Infinix phone
८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हा स्मार्टफोन ; 512GB स्टोरेज

संपन्न मल्टीमीडिया अनुभव :

नोट १२ प्रो मध्ये ६.७ इंच एफएचडी+ ट्रू कलर एएमओएलईडी डिस्प्लेसह व्यापक १००० नीट्स ब्राइटनेस, १०८ टक्के एनटीएससी रेशिओ व १०० टक्के डीसीआय पी३ कलर गम्यूट आहे, जे स्क्रिनवर सर्वोत्तम रंगसंगती निर्माण करते. गेमिंग अनुभवामध्ये अधिक वाढ करण्यासाठी डिवाईस १८० टच सॅम्प्लींग रेटसह युजर्सच्या हातांची बोटे व डिस्प्लेदरम्यान सुलभ इंटरअॅक्शनची खात्री देतो.

अपवादात्मक कार्यक्षमता :

उच्च कार्यक्षम ६ एनएम फॅब्रिकेशन तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेल्या अत्यंत शक्तिशाली हेलिओ जी९९ प्रोसेसरची शक्ती असलेल्या नोट १२ प्रो मध्ये नेक्स्ट-जनरेशन गेमिंग क्षमता आहेत.

चिपसेटमध्ये जवळपास २.२ गिगाहर्टझपर्यंतची ऑक्टा-कोअर सीपीयू क्लॉकिंग फ्रीक्वेन्सी, जवपास २.१३३ मेगाहर्ट्झपर्यंत उच्च कार्यक्षम एलपीडीडीआर४एक्स मेमरी आणि विशाल २५६ जीबी यूएफएस २.२-क्लास इंटर्नल स्टोरेज आहे, जे डेटा उपलब्धता वाढवण्यासोबत गेम्स, अॅप्स व दैनंदिन टास्क्समधील कार्यक्षमता वाढवतात.

कन्टेन्ट पाहण्यासंदर्भात विनाव्यत्यय अनुभवासाठी या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम व विशाल २५६ जीबी स्टोरेज क्षमता आणि समर्पित मेमरी कार्ड स्लॉट आहे, जे जवळपास २ टीबीपर्यंत वाढवता येते.

अद्भुत कॅमेरा अनुभव : नोट १२ प्रो दर्जात्मक कॅमेरा देण्याचा इन्फिनिक्सचा वारसा कायम ठेवतो. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या नोट १२ प्रोमध्ये १०८ मेगापिक्सल अल्ट्रा-क्लीअर कॅमेरासह सॅमसंग आयएसओसेल सेन्सर व क्वॉड-एलईडी फ्लॅश आहे, ज्यामुळे डिवाईस अधिक सुस्पष्टता, व्यापक रंगसंगती व अचूक फोकससह आकर्षक फोटोज कॅप्चर व तयार करतो. या स्मार्टफोन्समध्ये १६ मेगापिक्सल एआय सेल्फी कॅमेरासह ड्युअल-एलईडी फ्लॅश आहे.

Infinix phone
१३ हजारांचा फोन ७४९ रुपयांत खरेदी करण्याची संधी

सडपातळ व स्टायलिश डिझाइन :

मोठी स्क्रिन असलेला स्मार्टफोन म्हणून नोट १२ प्रो आकर्षकता व आरामदायीपणा लक्षात घेत डिझाइन करण्यात आला आहे. ही वैशिष्ट्ये अल्ट्रा स्लीक ७.८ मिमी फ्रेमसह एकूण ब्लॅक पॅनेलमधील अद्वितीय व प्रिमिअम अॅण्टी-ग्लेअर ड्युअल टोन मॅट फिनिशमध्ये डिझाइन करण्यात आली आहेत.

व्यापक बॅटरी बॅकअप :

नोट १२ प्रो मध्ये हेवी-ड्युटी ५००० एमएएच बॅटरी आहे, जिला ३३ वॅट चार्जिंग सपोर्ट आणि टाइप सी चार्जरचे समर्थन आहे. ज्यामुळे युजर्सना दीर्घकाळापर्यंत वेब ब्राऊज करण्याची किंवा आवडते व्हिडिओज पाहण्याची, गेम्स खेळण्याची किंवा गाणी ऐकण्याचा आनंद घेण्याची सुविधा मिळते, ज्यासाठी त्यांना वारंवार फोन चार्ज करावा लागत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com