Infinix चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉन्च, 6.82 इंच डिस्प्लेसह दमदार बॅटरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infinix smart 6 plus launch in india check price specifications and features

Infinix चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉन्च, 6.82 इंच डिस्प्लेसह दमदार बॅटरी

Infinix ने आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन Infinix Smart 6 Plus शुक्रवारी भारतात लॉन्च केला आहे. हा फोन मोठ्या 6.82 इंच एचडी प्लस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरीसह देण्यात आला असून या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. चला तर मग या फोनमध्ये तुम्हाला इतर कोणते स्पेसिफिकेशन्स मिळतात ते पाहूया

Infinix Smart 6 Plus ची किंमत

हा स्मार्टफोन Crystal Violet, Sea Blue आणि Miracle Black कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. फोनच्या 3 GB रॅम सह 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन 3 जुलैपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

Infinix Smart 6 Plus चे स्पेसिफिकेशन

हा फोन Android 12 आधारित XOS 10 सह येतो. Infinix Smart 6 Plus मध्ये 6.82-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 440 nits च्या ब्राइटनेस आणि 90.6 टक्के रेशोसह येतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि 3 GB रॅम दिली आहे, तसेच रॅम 6 GB पर्यंत वाढवता येते आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

Infinix Smart 6 Plus चे कॅमेरा

फोनमध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे , जो 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि AI डेप्थ सेन्सरसह येतो. या फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश लाईट देखील उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. समोर ड्युअल एलईडी फ्लॅश लाइट देखील मिळते.

Infinix Smart 6 Plus मध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळते आणि फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो USB पोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

टॅग्स :Technology