esakal | मनी ट्रांसफरसाठी WhatsApp Payment वापरताय? मग हे नक्की जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

WhatsApp-Payments
मनी ट्रांसफरसाठी WhatsApp Payment वापरताय? मग हे नक्की जाणून घ्या
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांसोबत चॅट करण्याशिवाय पेमेंट्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. या महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर, आपल्याला फोन, गूगल, भीम, पेटीएम किंवा इतर पेमेंट सर्व्हिस अ‍ॅप्स सारखे कोणतेही पेमेंट ट्रान्सफर अ‍ॅप ठेवण्याची आवश्यकता उरणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट यूपीआयच्या आधारे इतर कोणत्याही पेमेंट ट्रान्सफरप्रमाणेच काम करते. ज्यामध्ये आपण आपले बँक खाते थेट व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटसह संलग्न करू शकता. किंवा आपण दुसरा पर्याय म्हणून व्हॉट्सअॅप वॉलेटमध्ये पैसे ठेवू शकता. ज्यानंतर आपण थेट कोणाच्याही खात्यात पैसे हस्तांतरित करू शकता. परंतु आपण अद्याप व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट ट्रान्सफर फीचर वापरलेले नसल्यास किंवा प्रथमच वापर करणार असाल तर खाली देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

आपल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करा

व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट ट्रान्सफर फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करावा लागेल. परंतु येथे आपण आपल्या बँकेत रिजिस्टर्ड असलेल्या क्रमांकच लिंक करता येईल. कारण बँकेतून येणारे सर्व मेसेजेस, ओटीपी आणि कॉल एकाच नंबरवर येतील, तर मग लक्षात ठेवा की लिंक केलेला नंबर तुमच्या बँकेत नोंदणीकृत असावा