ISRO EOS : इस्रो पुढच्या 5 वर्षात अवकाशात पाठवणार 52 पृथ्वी निरीक्षण उपग्रह, देशाच्या सुरक्षेसाठीचा खास प्लॅन जाणून व्हाल शॉक

ISRO Earth Surveillance satellites : इस्रो पुढील पाच वर्षांत ५२ संरक्षण उपग्रह अवकाशात सोडणार असून, त्यातील निम्मे खासगी कंपन्यांकडून तयार होणार आहेत.
ISRO Earth Surveillance satellites
ISRO Earth Surveillance satellitesesakal
Updated on

ISRO Surveillance satellites Project : भारताच्या अवकाश संशोधन मोहिमांमध्ये आता खासगी क्षेत्राचा मोठा सहभाग पाहायला मिळणार आहे. इस्रो (ISRO) आणि IN-SPACe (Indian National Space Promotion and Authorization Centre) च्या माध्यमातून भारताने पुढील पाच वर्षांत ५२ सॅटेलाइट्स अवकाशात तैनात करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. हे उपग्रह भारताच्या संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणांच्या सशक्तीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती IN-SPACe चे अध्यक्ष डॉ. पवन कुमार गोएंका यांनी दिली आहे

सर्व्हेलन्स सॅटेलाइट्स

ही सॅटेलाइट्स विशेषतः भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी उपयुक्त असतील. त्यांचा वापर शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, सीमांचं बारकाईने निरीक्षण करणे आणि सैनिकी कारवायांमध्ये रिअल टाईम समन्वय साधणे यासाठी केला जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे, ५२ पैकी २६ उपग्रह खासगी क्षेत्रातर्फे तयार केले जाणार आहेत.

इस्रो SSLV तंत्रज्ञान खासगी कंपन्यांकडे हस्तांतरित

याच दरम्यान ISRO कडून एक मोठं पाऊल उचललं जात असून SSLV (Small Satellite Launch Vehicle) तंत्रज्ञान खासगी क्षेत्राला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. SSLV ही कमी वेळात, कमी खर्चात आणि अत्यल्प लॉंच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली प्रणाली आहे.

ISRO Earth Surveillance satellites
Pakistan Hackers : केंद्र सरकारचा अलर्ट! पाकिस्तान कधीही हॅक करू शकतो भारतीयांचे बँक अन् सोशल मीडिया अकाऊंट, असं राहा सुरक्षित

SSLV एक त्रिस्तरीय प्रक्षेपक यंत्रणा असून यात तीन सॉलिड प्रोपल्शन स्टेजेस आणि एक लिक्विड-प्रोपल्शन व्हेलोसिटी ट्रिमिंग मॉड्यूल (VTM) असतो. हे प्रक्षेपक 10 किलो ते 500 किलो वजनाचे उपग्रह 500 किमीच्या कक्षेत सोडू शकतात. संरक्षण क्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीत SSLV ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

IN-SPACe च्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं की, उपग्रहांचं नियंत्रण व त्यांचा अंतिम वापर हे गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयांवर आधारित असेल. मात्र खासगी कंपन्यांना सहभागी करून घेतल्याने भारताचं अंतराळ क्षेत्र अधिक गतिमान, स्वावलंबी आणि नाविन्यपूर्ण होईल, असं त्यांनी म्हटलं.

ISRO Earth Surveillance satellites
Samsung Galaxy F56 : आला रे आला, बजेट फोन आला! सॅमसंगने लॉन्च केला ‘F सिरीज’चा न्यू 5G मोबाईल, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

Global Space Exploration Conference 2025 दरम्यान दिलेल्या या माहितीतून हे स्पष्ट झालं आहे की, भारत केवळ विज्ञान वा संशोधनापुरता मर्यादित राहणार नाही, तर सुरक्षा, गुप्तचर आणि सर्जिकल तंत्रज्ञानाच्या बाबतीतही जागतिक व्यासपीठावर आपलं वर्चस्व निर्माण करेल.

भारताचं अंतराळ धोरण आता संरक्षणाच्या दिशेने अधिक झुकलेलं दिसत आहे आणि खासगी क्षेत्राचा सहभाग ही देशाच्या आत्मनिर्भरतेची नवी दिशा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com