

Instagram Microphone listening you myth debunked adam mosseri
esakal
Instagram: तुमच्या मनात नेहमी येणारा प्रश्न की, "मी आत्ताच ज्याबद्दल बोललो, त्याची जाहिरात इंस्टाग्रामवर कशी काय दिसली?" हे कोडं आता सुटलं आहे. अनेकांना वाटते की इंस्टाग्राम चोरून आपलं बोलणं ऐकतंय, पण खुद्द इंस्टाग्रामचे हेड ॲडम मोसेरी यांनी स्पष्ट केलंय की कंपनी तुमचा मायक्रोफोन वापरून खाजगी संभाषणं ऐकत नाही. ही भीती केवळ एक गैरसमज असून यामागे इंस्टाग्रामचं एक अतिशय प्रगत आणि सूक्ष्म अल्गोरिदम काम करत असतं, जे तुमच्या आवाजापेक्षा तुमच्या कृतींवर जास्त लक्ष देतं. (Instagram Head on Microphone Privacy)