
Instagram Update : तुमच्या अँड्रॉइड मोबाईलचे चार्जिंग अचानक जास्त संपू लागले आहे का? चार्जर जवळ ठेवल्याशिवाय फोन वापरणं अशक्य झालंय का? तर ही केवळ तुमचीच नव्हे, तर लाखो वापरकर्त्यांची समस्या आहे आणि या सगळ्यामागे आहे तुमचं आवडतं अॅप इंस्टाग्राम!
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय लोक इंस्टाग्रामचा वापर करताच त्यांच्या स्मार्टफोनची बॅटरी रॉकेटच्या वेगाने संपत असल्याच्या तक्रारी करत आहेत. इतकी बॅटरी कोण खाऊ शकतं? याचं उत्तर आहे इंस्टाग्राम!
अनेक अँड्रॉइड युजर्सनी निरीक्षण केलं की इंस्टाग्राम अॅप इतर कोणत्याही अॅपच्या तुलनेत जास्त बॅटरी वापरत आहे. उदाहरणार्थ, Samsung Galaxy A53 या फोनवर ५४ मिनिटे इंस्टाग्राम वापरल्यास १२.४% बॅटरी खर्च होते, तर WhatsApp फक्त २.४% बॅटरी वापरतो. हे प्रमाण पाहता इंस्टाग्रामने रील्सच्या माध्यमातून केवळ डेटा नव्हे, तर बॅटरीही ‘रिचार्ज’ होण्याआधीच संपवायला सुरुवात केली आहे
बॅटरी झपाट्याने संपत असल्यामुळे अखेर गुगललाही याची दखल घ्यावी लागली. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचा निर्माता असलेल्या गुगलने यावर चौकशी सुरू केली आणि खरंच इंस्टाग्राम अॅपमधील एक त्रुटी बॅटरीचा प्रचंड वापर करत असल्याचे स्पष्ट झाले.
काही वापरकर्त्यांनी इंस्टाग्रामचे जुनं व्हर्जन डाऊनलोड करून हा त्रास टाळायचा प्रयत्न केला. पण उलट त्यांच्या डिव्हाइसने अधिक गरम होण्यास सुरुवात केली म्हणजेच अडचण केवळ नव्या व्हर्जनपुरती मर्यादित नव्हती, तर इंस्टाग्रामच्या एकूण कार्यप्रणालीतच बिघाड होता.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गुगलने एक अधिकृत सल्लागार जारी केला असून त्यात म्हटलं आहे की इंस्टाग्रामने एक अपडेटेड अॅप आणलं आहे जे अँड्रॉइडवरील बॅटरी ड्रेनचा प्रश्न सोडवणार आहे. नवीन व्हर्जन Instagram 382.0.0.49.84 आता Google Play Store वर उपलब्ध आहे.
Google Play Store उघडा
सर्च बॉक्समध्ये ‘Instagram’ टाका
अपडेटचा पर्याय दिसल्यास लगेच अपडेट करा
अपडेटनंतर फोन रीस्टार्ट करा आणि मग... पुन्हा रील्सची मजा घ्या ते ही चार्जिंगचं टेंशन न ठेवता
तंत्रज्ञान कितीही स्मार्ट असलं, तरी वेळोवेळी अपडेट्स करणं आणि अॅप्सच्या परवानग्या तपासणं गरजेचं आहे. इंस्टाग्रामसारखा लोकप्रिय अॅप देखील चुकीच्या कोडिंगमुळे अडचणी निर्माण करू शकतो, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आता मात्र वापरकर्त्यांनी दिलासा घेतला आहे आणि इंस्टाग्रामला पुन्हा एकदा ‘फुल चार्ज’ मिळाला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.