व्हिडिओ चोरीला आळा! Instagram वर आले नवे Content Protection फीचर; कसे काम करते अन् कोणाला मिळेल फायदा?

तुमचा व्हिडिओ कोणी वापरला? Instagram वर कळणार एका क्लिकवर...जुने व्हिडिओही सुरक्षित करता येणार!
Instagram Content Protection Detect Copied Videos Easily

Instagram Content Protection: Detect Copied Videos Easily

esakal 

Updated on: 

Instagram Content Protection: सोशल मीडियावर व्हिडिओ निर्मिती वाढल्यापासून मूळ क्रिएटर्सचे कंटेंट परवानगीशिवाय दुसऱ्या अकाउंटवर रीपोस्ट होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे मूळ कलाकाराचे श्रेय आणि संभाव्य व्ह्यूज किंवा फॉलोअर्स दुसऱ्या खात्याकडे जातात. यावर उपाय म्हणून Instagram ने Content Protection हे नवे फीचर सुरू केले असून, ते पात्र क्रिएटर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

क्रिएटर्सना प्रत्येक वेळी स्वतः वेगवेगळी खाती तपासून कॉपी झालेले व्हिडिओ शोधण्याची गरज भासू नये, हा या प्रणालीमागचा मुख्य उद्देश आहे. Meta च्या Rights Manager मधील व्हिडिओ ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित हे फीचर Instagram आणि Facebook या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर सातत्याने तपासणी करते.

Loading content, please wait...